Mrunal Thakur Life Unknown Facts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrunal Thakur Turns 32: ‘मला आयुष्यात ही एकच गोष्ट हवी...’, मृणाल ठाकूरने मुलाखतीत व्यक्त केली इच्छा

Mrunal Thakur Life Unknown Facts: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस. तिचा वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांसमोर तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

Chetan Bodke

Mrunal Thakur Birthday

अभिनेत्री मृणाल ठाकूरने फार कमी वेळेतच भारतीय सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी छाप पाडली. बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही मृणालने स्वत:च्या अभिनयाची छाप पाडली. चित्रपटासह, वेबसीरिज आणि मालिकेतून तिने स्वत:ची एक वेगळीच छाप पाडली आहे. नेहमीच आपल्या अभिनया करिता चाहत्यांमध्ये प्रसिद्धीत असलेल्या मृणालचा आज वाढदिवस आहे. मृणाल आज ३२ व्या वर्षी पदार्पण करत असून तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक मुलाखत व्हायरल होत आहे. यावेळी तिने मुलाखतीत चाहत्यांसमोर तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न चाहते करत असतात. मृणाल नेहमीच आपल्या फॅशन सेन्ससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असते. मृणाल एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने एका संकेतस्थळाला दिलेली मुलाखत सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. या मुलाखतीतील अभिनेत्रीचं विधान बरंच चर्चेत आलं आहे. “आयुष्यात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, अपेक्षाभंग झाला तर, दु:ख आपल्यालाच होतं.”असं तिने त्या मुलाखतीत म्हटलं आहे. सोबतच त्यानंतर अभिनेत्रीने मुलाखतीत ब्रेकअप, तिच्या करियरमधील बऱ्याच घडलेल्या गोष्टींवर तिने भाष्य केलंय.

यावेळी मुलाखतीत तिला तुझ्या आयुष्यात नेमकं काय हवंय, असा प्रश्न विचारला होता. यावर ती म्हणाली, माणसांना आपल्या आयुष्यात पैसा, चैनीचं आयुष्य आणि प्रतिष्ठा अशा गोष्टी हव्या असतात. पण माझा स्वभाव तसा नाही, मला माझ्या आयुष्यात दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी राहण्यासाठी आवडते. मला आयुष्यात खूप काही मिळवायचं आहे. पण त्यासोबतच माझ्यासाठी आपल्याला आयुष्यात प्रेम हे जास्त महत्वाचं वाटतं. मी समोरच्या व्यक्तीकडून सहसा जास्त अपेक्षा ठेवत नाही. जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्यानाही तर आपण दुखावलो जातो. म्हणून मी कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही.

मृणालच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे तर, तिचे वडील बँक कर्मचारी आहेत. वडील बँकेत काम करत असल्यामुळे तिला बालपणात संपूर्ण भारतभर फिरायची संधी मिळाली. जवळपास तिने लहानपणापासून ११ घरं बदलली आहेत. तिने त्याचवेळी महाराष्ट्रात देखील आपले मित्र बनवले आहेत. मृणाल मुळची धुळ्याची असून तिचं महाविद्यालयीन शिक्षण चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे. त्या कॉलेजमधून मृणालने मास मीडियाची डिग्री घेतली आहे. मृणालला खरी ओळख ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून मिळाली आहे. सोबतच मृणालने काही मराठी मालिकेतही काम केले आहे.

मुलाखतीत मृणालला तिच्या लव्ह लाईफबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले होते. मृणाल म्हणते, मला माझ्या आयुष्यात असा व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून हवा आहे, मी त्याला हक्काने माझा बॉयफ्रेंड नवरा आणि एक चांगला मित्र म्हणू शकेल. त्याच्यासोबत माझ्या आयुष्यातील महत्वाचे क्षण, आनंदी क्षण अगदी मजेशीर घालवू शकेल. सोबतच मी त्याच्यासोबत संपूर्ण जग देखील फिरू शकेल. मृणाल बॉलिवूडमधील नेहमीच चर्चित अभिनेत्री असून तिला बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी, तेलगू, तमिळ चित्रपटांतही अभिनय करण्याची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Puri Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मेथीची कुरकुरीत पुरी, सोपी आहे रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT