मुस्लीमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश - अभिनेता कमाल खान Saam Tv News
मनोरंजन बातम्या

मुस्लीमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश - अभिनेता कमाल खान

अफगाणीस्तानसारख्या मुस्लीम धर्मीय देशात मुस्लीम जनताच भयभीत आहे असे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत अभिनेता कमाल खान यानं आपलं मत मांडलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) तालिबाननं (Taliban) ताबा घेतल्यानंतर अफगाणी नागरिक मोठ्या प्रमाणात पलायन करतायत. अनेक जण दुसऱ्या देशांमध्ये शरणागती आणि आसरा घेण्यासाठी धडपड करतायत. यात बहुसंख्य नागरिक हे मुस्लीम धर्माचे (Muslim Peoples) आहेत. त्यामुळे मुस्लीम धर्मीय देशात मुस्लीम जनताच भयभीत आहे असे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत अभिनेता कमाल खान (Actor Kamal Khan) यानं आपलं मत मांडलंय. (India is the safest country for Muslims said Actor Kamal Khan)

हे देखील पहा -

याबाबत कमाल खानने ट्विट करत लिहीलं की, ''अफगाणिस्तानातील अनेक मुस्लीम त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतात प्रवेश करतायत, माझं म्हणणं १००% खरं ठरलं. भारत हा मुस्लीमांसाठी जगातील सर्वात सुरक्षित देश आहे.'' या ट्विटसोबतच त्याने एका वृत्तपत्राचा फोटोही शेयर केला आहे. त्यात त्याने आपल्या मुलांना महत्वाचा सल्ला देत लिहीलं की, ''जगात कुठंही जा, काहीही करा, पण आपलं राष्ट्रीयत्व बदलू नका. कारण, भारत हा जगातील सर्वात चांगला देश आहे. काही भारतीय मुस्लीमांना भारतात असुरक्षित वाटतं कारण त्यांना इतर मु्स्लीम देश पाहिले नाहीत.'' असं कमाल खान म्हणाला आहे.

मुस्लीमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश - अभिनेता कमाल खान

कमाल खान बॉलिवुडमध्ये फारसं काही करु शकला नाही तरी तो त्याच्या स्वभावामुळे आणि काही ना काही वक्तव्य करत सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. २००९ ला बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमध्ये तो झळकला होता. या शिवाय त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील आहे.

Kamaal R Khan - KRK या नावाने त्याचे यूट्यूब चॅनेल असून त्यावर आठ लाखांपेक्षा जास्त सबस्काईबर्स आहेत. या चॅनेलवर तो सिनेमांचे रिव्हीव्यू करत असतो. त्याच्या अजब वक्तव्यांमुळे तो अनेकदा ट्रोलही होत असतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT