कंगना राणावत  SaamTvNews
मनोरंजन बातम्या

1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक; खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं - कंगना, पहा Video

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यांनतर कंगना राणावतने, प्रचंड त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्यावर बेताल वक्तव्य केलं. यावर अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनावर जोरदार टीका केलीय.

वृत्तसंस्था

नेहमी वादात असणारी आणि वादग्रस्त वक्तव्ये करणारी कंगना राणावत पुन्हा एकदा एका नव्या वादात सापडली आहे. 'टाईम्स नाऊ समिट 2021' (Times Now Summit 2021) या शिखर संमेलनात कंगनाने चक्क भारतीय स्वातंत्र्यावरच भाष्य केलंय! "१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले होते, भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले" असं कंगना राणावत ने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर ने जोरदार टीका केली आहे.

८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेत्री कंगना राणावत हिला देखील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून बरीच टिकाटिप्पणी झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. पद्मश्री मिळाल्यांनतर कंगना ने केलेले हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ समिट 2021 मध्ये निवेदिका नाविका कुमार समोर कंगना म्हणाली, "स्वातंत्र्य जर भिकेच्या स्वरूपात मिळत असेल तर ते स्वातंत्र्य होऊ शकते का? देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर माजी सनदी अधिकाऱ्यांपासून ते अनेक काँग्रेस तसेच भाजप नेत्यांसमवेत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

कंगना तिच्या वक्तव्यात म्हणाली- 'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोलायचे झाले, तर या लोकांना माहित होतं या स्वातंत्र्यसंग्रामात मोठ्या प्रमाणात रक्तपात होणार आहे. मात्र, हेही लक्षात ठेवलं पाहिजे कि, भारतीयांनी भारतीयांचं रक्त नाही सांडलं पाहिजे' त्यातून अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची मोठी किंमत चुकवली. मात्र, स्वातंत्र्य नव्हते, भिक होते. त्याने अर्थातच स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, भिक मागणे होते. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये मिळाले.

यावर नाविका कुमार म्हणाल्या - 'म्हणूनच सगळे म्हणतात कि तू भगवा समर्थक आहेस.' यावर उत्तर देताना कंगना म्हणाली- यानंतर माझ्यावर आणखी 10 केसेस होणार आहेत. नाविका म्हणाल्या - "तुम्ही आता दिल्लीत आहात'. यावर कंगना म्हणाली - जायचं तर घरीच आहे"

कंगनाने हे वक्तव्य केल्यानंतर कार्यक्रमात बसलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली 'कोण आहेत ते मूर्ख लोक जे हे ऐकून टाळ्या वाजवू लागले. मला जाणून घ्यायचे आहे.'

कंगनाच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, "ज्या स्वातंत्र्यासाठी लाखोंनी प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्याला भीक म्हणणे यालाच असंतुलित, मानसिक दृष्ट्या विकृत म्हणावं लागेल. कंगनाकडून दुसरी अपेक्षा तर काय? पण नाविका जी, स्वातंत्र्यासाठी वापरण्यात आलेल्या या स्वस्त शब्दावर आणि विधानावर तुम्ही टीका का केली नाही?

यावर माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले- 'म्हणूनच म्हटले होते की, "प्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बना, कंगना नाही." भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानास भीक म्हणणारी कंगना तुझ्याबाबदल न बोललेलंच बरं"

काँग्रेस नेते श्रीनिवास बीवीही संतापाने म्हणाले- 'अश्या लोकांना पद्मश्री देणारे मोदीजी उत्तर द्या, आपण त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्त्सव साजरा करताय कि, तुमच्या भक्ताच्या म्हणण्यानुसार भीक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्त्सव साजरा करताय?

समाजमाध्यमावर एका नेटकाऱ्याने कंगनावर टीका करताना लिहलंय "लाकडी घोड्यावर प्लास्टिकची तलवार घेऊन वीरांगना बनलेली सरकारी चाटुकार, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहे. लाखोंच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणत आहे.

जर तुझ्या म्हणण्यानुसार 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे इंग्रजांनी दिलेली भीक होती, तर 2008 आणि 2014 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात तुला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. मग ती भीक तू का घेतलीस, 'झांसे की रानी' लबाड राणी."

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT