Urvashi Rautela
Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ind vs Pak: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पोहचली उर्वशी, सोशल मीडियावर ट्रोल

Shivani Tichkule

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामना पाहण्यासाठी दुबईला गेली. यावेळी तिला स्टेडियममध्ये पाहताच सोशल मीडियावर एकच चर्चा. उर्वशीचे अनेक फोटो आणि मीम्सने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यूजर्स तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवाती केली.

काही दिवसांपूर्वी उर्वशीचे Ask me anything चे सेशन होते. या सत्रात उर्वशीने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान चाहत्याने उर्वशीला तुमचा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारला होता. यावर उर्वशीने मला क्रिकेट बघायला आवडत नाही असे उत्तर दिले होते. मी क्रिकेट अजिबात बघत नाही. मी एकाही क्रिकेटपटूला ओळखत नाही. मी सचिन तेंडुलकर सर आणि विराट कोहली सरांचा खूप आदर करतो असे देखील ती म्हणाली होती.

हे देखील पाहा -

त्यानंतर आता उर्वशीने दुबईच्या मैदानात हजेरी लावताच नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. उर्वशीच्या वक्तव्यावर युजर्स तिला ट्रोल करू लागले आहे. उर्वशी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. युजर्स उर्वशीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे फनी मीम्स बनवत आहेत. एका युजरने उर्वशीचा फोटो आणि तिचा प्रश्न आणि शार्क टँक फेम अवनीश ग्रोवरचा प्रसिद्ध संवाद यावर मीम बनवला. युजरने लिहिले की, 'हे सर्व ढोंगीपणा आहे.'

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विराट कोहली आणि केएल राहुल याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT