Star Kids  Instagram @agastya.nanda
मनोरंजन बातम्या

Star Kids Debut In 2023: बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची मुले २०२३मध्ये करणार पदार्पण, पाहा कोणत्या स्टारकिड्सचा आहे यात समावेश

नवे वर्ष गाजवणार स्टारकिड, २०२३मध्ये करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण.

Pooja Dange
Khushi Kapoor

खुशी कपूर

जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. २०२३मध्ये खुशी कपूर जोया अख्तर दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'द आर्चीस' चित्रपटातून खुशी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Suhana Khan

सुहाना खान

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सुद्धा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहे. सुहाना सुद्धा जोया अख्तर दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'द आर्चीस' चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Shanaya Kapoor will make her Bollywood debut with Karan Johars Bedhadak movie

शनाया कपूर

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर 'बेडधडक' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार आहे. शनाया कपूरने चित्रपटाच्या संबंधित पोस्ट सुद्धा तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती कारण जोहर करणार असून दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत.

Agstya Nanda

अगस्त नंदा

बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा सुद्धा २०२३मध्ये अभिनय क्षेत्रातील त्याच्या करिअरची सुरूवात करणार आहे. अगस्त देखील जोया अख्तरच्या 'द आर्चीस' चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

Ibrahim Ali Khan

इब्राहिम अली खान

इब्राहिम अली खान करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन बमन इराणी यांचा मुलगा कायोज इराणी करणार आहे. या चित्रपटाचे कथानक लष्करावर आधारित आहे. इब्राहिम अली खानने 'रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Alizeh Agnihotri

अलिजेह अग्निहोत्री

सलमान खानची बहीण अलवीरा अग्निहोत्रीची मुलगी अलिजेह अग्निहोत्री निर्माता सौमेंद्र पाधी यांच्या मागी चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यांची त्यांच्या या चित्रपटाचे शूटिंग सुद्धा सुरू करण्यात आले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Pashmina Roshan

पश्मिना रोशन

राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क'चा सिक्वेल आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Palak Tiwari

पलक तिवारी

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे. 'रोजी: द सॅफरन चॅप्टर' या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉय, तनिषा मुखर्जी, मल्लिका शेरावत आणि शिवीन नारंग यांच्यासह पलकने काम केले होते. हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही.

Tanisha Santoshi

तनिषा संतोषी

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी देखील 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'गांधी गोडसे : एक युद्ध' या चित्रपटातून ती तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे. नुकताच या चित्रपटातील तनिषाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.

आस्मान भारद्वाज

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मुलगा आस्मान भारद्वाजही दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. दिग्दर्शक म्हणून आस्मान अर्जुन कपूरच्या 'कुत्ते' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT