Imran Khan Divorce Avantika Malik Saam TV
मनोरंजन बातम्या

Imran Khan Divorce: बॉलिवूडच्या मामा-भाच्याच्या आयुष्यात एकसारखीच नको ती घटना घडलीये; बड्या अभिनेत्याच्या आयुष्यात कोणतं वादळ आलंय?

Imran Khan-Avantika Malik: इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते.

Saam Tv

Imran Khan Divorce Avantika Malik: आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक दिवस इम्रानच्या घटस्फोटची चर्चा सुरू होती. पण आता मात्र त्यावर स्पष्ट बोलू शकतो अशी माहिती समोर आली आहे.

इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक हे बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते, परंतु आता त्यांचा घटस्फोट झाला आहे, किमान सोशल मीडियावरील अवंतिकाच्या पोस्टवरून असे दिसत आहे.

अवंतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री आणि गायिका मायली सायरसचा स्टेजवर नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. तसेच तिने त्या व्हिडिओला कॅप्शन दिले होते, 'तिचा घटस्फोट तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट होती'. अवंतिकाने तेच पुन्हा शेअर केले, "फक्त तिच्यासाठी नाही... #justsaying," मायलीने 2018-2020 मध्ये अभिनेता लियाम हेम्सवर्थशी लग्न केले होते.

इम्रान आणि अवंतिका दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांनी पुन्हा डेटिंगला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी, इम्रान, अभिनेता लेखा वॉशिंग्टनसोबत दिसला होता. दोघेही कपलसारखे हातात हात घालून वावरत होते. तर अवंतिका साहिब सिंग लांबाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ज्यांच्यासोबत ती कधी कधी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

अवंतिका आणि इम्रान यांनी २०११ मध्ये लग्न केले आणि त्यांना आठ वर्षांची इमारा मलिक खान ही मुलगी आहे.

'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या इम्रानने मेरे ब्रदर की दुल्हन, दिल्ली बेली, आय हेट लव स्टोरीज, एक मैं और एक तू आणि इतर चित्रपटांमध्ये काम केले. अखेरीस त्याने 2015 मध्ये अभिनयाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News :एसटी बसची दुचाकींना धडक, अपघातात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघेजण जखमी

Mobile Care Tips : फोन पावसात भिजून बंद पडला? 'या' घरगुती टिप्स एकदा ट्राय कराच, खर्चही वाचेल

Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

SCROLL FOR NEXT