Karan Vohra Twins Baby Instagram
मनोरंजन बातम्या

Karan Vohra Twins Baby: नवखी चाहूल, इवलं पाऊल... टिव्ही अभिनेत्याच्या पत्नीने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म

Karan Vohra Baby: टेलिव्हिजन अभिनेता करण वोहराची पत्नी बेला बोहराने नुकतंच जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

Chetan Bodke

Karan Vohra Shared On Good News: टेलिव्हिजन अभिनेता करण वोहराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पत्नी बेला बोहराने नुकतंच जुळ्या बाळांना जन्म दिल्याने त्याच्यासह सर्वच कुटुंबीय आनंदात आहे. सध्या बेला आणि दोन्ही मुलांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती खुद्द करणनेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

अभिनेत्यासह त्याची पत्नी सध्या दिल्लीत आहे. करण वोहराने अतिशय खास पद्धतीने गुड न्यूज केली. त्याने टी-शर्टवर इट्स ट्विन बॉईज असे लिहून पोस्ट शेअर केली आणि आपला आनंदही व्यक्त केला. करणला इमली सारख्या अनेक मालिकेंमधून प्रसिद्धी मिळाली आहे.

खास गोष्ट म्हणजे करण आणि बेलाच्या लग्नाला तब्बल १० वर्ष झाली असून त्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. त्यामुळे सहाजिकच अभिनेत्याच्या आणि त्याच्या पत्नीच्याही चेहेऱ्यावर एक वेगळाचा आनंद दिसून येत आहे.

नुकतीच अभिनेत्री गौहर खानने देखील चाहत्यांसोबत काही दिवसांपूर्वी आई झाल्याची गोड बातमी दिली होती. आता तिच्यानंतर टेलिव्हिजन अभिनेता करण वोहराच्या घरीही आनंदाचा क्षण आला आहे, ती गूड न्यूज त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आता सर्वच चाहत्यांच्या नजरा अभिनेत्री दीपिका कक्करवर येऊन खिळल्या आहेत. लवकरच ती देखील एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT