khushi kapoor and ibrahim ali khan Nadaaniyan Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Nadaaniyan: पहिल्या प्रेमाची जादू आणि जेन झीचा गोंधळ; ‘नादानियां’ मधून इब्राहिम अली खानची बॉलिवूडमध्ये एंट्री

Nadaaniyan Movie Poster released: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे

Shruti Vilas Kadam

Nadaaniyan: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याचे चाहते उत्सुक आहेत. इब्राहिमने त्याच्या 'नादानियां' या पहिल्या चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर रिलीज केला आहे, ज्यामध्ये तो श्रीदेवीची धाकटी मुलगी अभिनेत्री खुशी कपूरसोबत दिसत आहे.

या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिले, 'नादानियां' हा एक रोमँटिक ड्रामा आहे जो पहिल्या प्रेमाची जादू, वेडेपणा आणि निरागसता दाखवतो. या सर्वांच्या केंद्रस्थानी पिया (खुशी) आहे, जी दक्षिण दिल्लीतील एक धाडसी मुलगी आणि नोएडाचा मुलगा अर्जुन (इब्राहिम) एकमेकांना तेव्हा पहिल्या प्रेमाच्या गोड प्रवासाला सुरुवात होते."

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली 'नादानियां' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या रोमँटिक चित्रपटात इब्राहिम सुनील शेट्टी, दिया मिर्झा, महिमा चौधरी आणि जुगल हंसराज सारख्या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करत आहे.हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत.

नेटफ्लिक्स इंडिया ओरिजिनल फिल्म्सच्या संचालिका रुचिका कपूर शेख म्हणाल्या, "नादानियां हा चित्रपट तरुण प्रेमातील निरागसता आणि प्रामाणिकपणा दाखवतो. करण जोहरच्या धर्मॅटिक एंटरटेनमेंटचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर, 'नादानियां' या चित्रपटातून शौना गौतम दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत, ज्यांनी यापूर्वी करण जोहरला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये सहाय्यक म्हणून काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर पाठोपाठ, आता कुंभासाठी बोगस भरतीचा प्रकार उघड

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

SCROLL FOR NEXT