Saurabh Abhyankar Instagram
मनोरंजन बातम्या

Hustle 03 News: अमरावतीच्या पोट्ट्याचा 'हसल 03'मध्ये धुमाकूळ; युट्यूबवर ट्रेंड होतोय 'शिवरायांचा मावळा'

Saurabh Abhyankar ASA 100RBH: सौरभ अभ्यंकरने हसलमध्ये मराठीमध्ये रॅप सादर केला.

Pooja Dange

Amaravati Cha Potta Trending On YouTube:

पहिला रॅप रिअॅलिटी शो 'हसल'चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या सीजनमध्ये देखील अनेक तगडे रॅपर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण सध्या या शोमधील एका रॅपरची सर्वत्र चर्चा आहे.

अमरावतीचा पोट्टा म्हणून फेमस होत असलेला या रॅपरचे नाव सौरभ अभ्यंकर असे आहे. सौरभ 100RBH या नावाने प्रसिद्ध आहे. हसल 03 मधील त्याचा रॅप यूट्युबवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सौरभ अभ्यंकरने हसलमध्ये मराठीमध्ये रॅप सादर केला. 'आला अमरावतीचा पोरगा, खरं खरं मी गाण्यात सांगतो, जे पाहिलं जे अनुभवलं, सारं गाण्यात माझ्या मांडतो. अरे शिवरायांचा मावळा हाओ मी भेत नाही पण भेवाडतो.' असे शब्द गुंफून त्याने जबरदस्त रॅप केला. त्याचा हा रॅप ऐकूण सगळ्या परीक्षकांनी देखील त्याचे कौतुक केले.

सौरभ अभ्यंकरचा हा रॅप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सौरभ सोशल मीडियावर खुप सक्रियआहे. इंस्टाग्रामवर त्याचे 24.2 K फॉलोवर्स आहेत.

सौरभने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केले आहे. सौरभ 'झुंड' या चित्रपटामध्ये (Movie) दिसला होता. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.

अमरावतीचा हा पोट्टा आता हसल ०३ मध्ये देखील त्याच्या रॅपने सगळ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पहिल्याच रॅपने सगळ्यांची मने जिंकली आहेत. मराठीत रॅप करणारा तो या एकमेव कलाकार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT