Tiku Talsania Google
मनोरंजन बातम्या

Tiku Talsania : प्रसिद्ध कॉमेडियन टिकू तलसानियाला हार्ट अटॅक, प्रकृती चिंताजनक, उपचार सुरू

Tiku Talsania : प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता टिकू तलसानिया अचानक आजारी पडले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Tiku Talsania : प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता टिकू तलसानिया अचानक आजारी पडले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. असे वृत्त आहे की अभिनेत्याची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे, डॉक्टर अजूनही त्यांची तब्येत बिघडण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

टिकू तलसानिया हे ७० वर्षांचे आहे. ते इंडस्ट्रीतील एक ज्येष्ठ अभिनेते म्ह्णून ओळखले जातात. अशा परिस्थितीत, अभिनेते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा त्याचे सहकारकर आणि चाहते करत आहेत. टिकू तलसानियाच्या कुटुंबाकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. टिकू तलसानिया यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

अभिनेता टिकू तलसानिया यांचा जन्म १९५४ मध्ये झाला. त्यांनी १९८४ मध्ये 'ये जो है जिंदगी' या लोकप्रिय शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९८६ मध्ये त्यांनी 'प्यार के दो पल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. विविध पात्रे साकारणारा टिकू तलसानिया त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाऊ लागले. त्यांची विनोदी शैली आणि वेळ दोन्ही अद्भुत आहेत. त्यांची संवादकहाणी प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुरेशी आहे.

टिकू तलसानिया यांनी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत 'एक से बढकर एक', 'हुकुम मेरे आका', 'गोलमाल है भाई सब गोलमाल है', 'प्रीतम प्यारे और वो' आणि 'साजन रे झूट मत' असे काही उत्तम टीव्ही शो दिले आहेत. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 'दिल है की मानता नहीं', 'बोल राधा बोल', 'अंदाज अपना अपना', 'इश्क', 'देवदास', 'पार्टनर', 'धमाल' आणि 'स्पेशल २६' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT