Sangee : मैत्री की पैसे? संगी चित्रपटातून उलगडणार मित्रांची अनोखी कथा! ट्रेलर प्रदर्शित

Sangee Trailer : नववर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तसेच मराठी मधील आणखी एका नवीन हटके चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. संगी हा चित्रपट मैत्रीवर आधारित असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Sangee Movie Trailer
Sangee Movie TrailerPR
Published On

Sangee : अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टिझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होतीच आणि आता ट्रेलरमधून चित्रपटाचा मनोरंजक प्रवास अधिकच समोर आला आहे. हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा अफाट डोस यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल, हे नक्की!

'संगी'ची कथा तीन मित्रांभोवती फिरताना दिसत असून या तिघांच्या आयुष्यातील बालपणापासूनचे गंमतीशीर,आनंददायी क्षण यात हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, पैसे आणि त्यातून येणारे रंजक वळण दिसत आहे. आता या मैत्री आणि पैसे हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.

Sangee Movie Trailer
Yuzvendra Chahal Dating RJ Mahvash : 'दुसऱ्याची इमेज वाचवण्यासाठी...'; धनश्रीवर निशाणा, चहलसोबत नाव जोडलेल्या मिस्ट्रीगर्लनं दिली प्रतिक्रिया

चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणतात," ‘संगी’ हा चित्रपट मित्रांच्या फक्त गंमतीजंमतींवर गोष्ट नाही तर मैत्रीची खरी खोली उलगडणारी कथा आहे. हलक्याफुलक्या विनोदांमधूनच आम्ही प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी कथा सादर केली आहे. तीन मित्रांची ही कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल, याची मला खात्री असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा."

Sangee Movie Trailer
Khushi Kapoor : श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाली खुशी कपूर; म्हणाली, 'आज ती असती तर...'

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे 'संगी'चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘संगी’ हा चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com