Delhi Crime Season 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delhi Crime Season 3: शेफाली शाहच्या दिल्ली क्राइममध्ये 'या' अभिनेत्रीचा एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत करणार डीसीपीशी सामना

Delhi Crime Season 3: प्रेक्षक दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या पहिल्या दोन सीझनवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. यावेळी शोमध्ये एक नवीन एन्ट्री होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Delhi Crime Season 3: शेफाली शाह स्टारर नेटफ्लिक्स वेब सीरिज 'दिल्ली क्राइम' प्रेक्षकांना खूप आवडली. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीच्या रस्त्यावर घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. सत्य घटनेवर आधारित या शोच्या पहिल्या सीझनला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारही मिळाला. त्याच्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता बऱ्याच काळापासून प्रेक्षक दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने शोच्या तिसऱ्या सीझनबाबतचा सस्पेन्स फोडले आहे.

हुमा कुरेशीच्या मुलाखतीनुसार, निर्मात्यांनी दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनसाठी तिच्याशी संपर्क साधला आहे. या लोकप्रिय वेब सिरीजचा तिसरा सीझन सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. व्हरायटीच्या वृत्तानुसार, हुमा कुरेशी दिल्ली क्राइम ३ मध्ये शेफाली शाहच्या विरुद्ध दिसू शकते. या शोमध्ये ती शेफालीसोबत नकारात्मक भूमिका साकारताना दिसेल.

हुमा कुरेशीने व्यक्त केला आनंद

व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, हुमा कुरेशी म्हणाली, 'जेव्हा निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनसाठी मला संपर्क साधला तेव्हा माझ्या आनंद झाला. मला नकारात्मक भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला. मला आशा आहे की मी माझ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.

तनुज चोप्रा दिग्दर्शन करतील

दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन तनुज चोप्रा यांनी केले होते. या शोचा पहिला सीझन दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या बलात्काराच्या घटनेवर आधारित होता. दुसरा सीझन एका सायको-मर्डर मिस्ट्रीवर आधारित होता. या शोचा पहिला सीझन २०१९ मध्ये आला. पहिल्या सीझनचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT