Thandel Trailer : 'पुष्पा का बाप...'; नागा चैतन्य-साई पल्लवीच्या 'थंडेल' चित्रपटचा ट्रेलर लॉन्च

Thandel Trailer : नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्या 'थांडेल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चंदू मोंडेटी दिग्दर्शित 'थंडेल' हा चित्रपट फेब्रुवारी महीन्यात रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Thandel Trailer
Thandel Trailer Saam Tv
Published On

Thandel Trailer : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यच्या 'थंडेल' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी स्टारर 'थंडेल' हा एक अ‍ॅक्शन ड्रामा आहे जो एका मच्छीमाराची कहाणीवर आधारित आहे. त्याला आंतरराष्ट्रीय महासागरात पाकिस्तानी सैन्याने पकडले जाते आणि त्यामुळे त्याच्यावर ओढवणाऱ्या संकटाचे वर्णन करण्यात आले आहे.

या चित्रपटात नागा आणि साई मुख्य भूमिकेत आहेत, तर संदीप आर वेद खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'थंडेल' हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहेत. तसेच त्यात देशभक्तीची भावना आणि अनेक भावनिक दृश्ये ही प्रेक्षकांनापाहायला मिळणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर, चाहते आधीच ब्लॉकबस्टर आणि २०२५ मधील सर्वात मोठा चित्रपट म्हणत आहेत. अनेकांच्या प्रतिक्रियांमध्ये असेही म्हटले आहे की हा चित्रपट 'पुष्पाचा बाप' आहे.

Thandel Trailer
Mere husband ki biwi: अर्जुन कपूरच्या चित्रपटात 'या' युट्यूबरची एन्ट्री;'मेरे हसबंड की बीवी'च्या ट्रेलरमध्ये दिसली झलक

नागा चैतन्य आणि साई पल्लवीची केमिस्ट्री

नागा चैतन्यने प्रेक्षकांना वेड लावले आहे तर साई पल्लवी तिच्या आकर्षणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याआधी, नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांनी 'लव्ह स्टोरी' या चित्रपटामध्ये एकत्र काम करून प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

Thandel Trailer
Budget 2025: 'हमारी सुबह कब आएगी…'; दिग्दर्शक मुकेश भट्ट यांचा निर्मला सीतारमणांना सवाल

'थंडेल' रिलीज डेट

चंदू मोंडेटी दिग्दर्शित 'थंडेल' हा चित्रपट गीता आर्ट्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे आणि अल्लू अरविंद यांनी त्याची निर्मिती केली आहे. 'थंडेल' हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com