Huma Qureshi Cousin Murder Saam Tv
मनोरंजन बातम्या

Huma Qureshi Cousin Murder: हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तरुणीसोबतचं कनेक्शन उघड

Huma Qureshi Cousin Murder Update: दिल्लीत, बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे गौतम आणि उज्ज्वल आहेत हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

Shruti Vilas Kadam

Huma Qureshi Cousin Murder: गुरुवारी रात्री ११ वाजता दिल्लीतील निजामुद्दीन स्टेशनजवळ घडलेल्या एका खळबळजनक घटनेने मन हेलावून टाकले. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ याचे उज्ज्वल आणि गौतम नावाच्या तरुणांशी त्याच्या स्कूटीच्या पार्किंगवरून भांडण झाले. हे प्रकरण इतके वाढले की दोघांनीही आसिफ कुरेशीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात आसिफ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी आसिफला मृत घोषित केले.

आसिफच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक केली. आता या प्रकरणात एका मुलीचे नावही समोर आले आहे. मुलीचे नाव शैली आहे. शैलीच्या सांगण्यावरून उज्ज्वल आणि गौतमने आसिफवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

शिवीगाळ केली आणि नंतर हल्ला केला

आसिफची पत्नी शैनाज कुरेशी हिने जबाब दिला आहे. शैनाजच्या म्हणण्यानुसार शेजारी उज्ज्वल आणि गौतम यांनी आधी आसिफला शिवीगाळ केली. त्यानंतर आसिफ कामावरून परतला होता. त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी समोरून हलवण्यास सांगितले. या प्रकरणावरून भांडण सुरू झाले. आसिफच्या पत्नीने असेही सांगितले की नोव्हेंबर २०२४ मध्येही शेजाऱ्यांशी भांडण झाले होते. आसिफचा भाऊ जावेद आणि काका सलीम यांनी आरोपींनी किरकोळ कारणावरून क्रूरपणे गुन्हा केल्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याची मागणी केली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट

हत्येचा हा हृदयद्रावक प्रकार भोगल बाजार लेन येथील आहे. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री हुमाचा चुलत भाऊ आसिफ याची निजामुद्दीन परिसरात दोन जणांनी धारदार वस्तूने वार करून हत्या केली. आम्हाला तक्रार मिळाली असून त्यानुसार, पार्किंगवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यानंतर उज्ज्वलने आसिफवर धारदार वस्तूने हल्ला केला. हल्ल्यात आसिफचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालाची वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT