Vikram Vedha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Vedha : विक्रम वेधामध्ये हृतिक रोशन दिसणार ३ वेगवेगळ्या लूकमध्ये

हृतिक रोशन विक्रम वेधा या चित्रपटात तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खानच्या(Saif ali Khan) 'विक्रम वेधा'(VikramVedha) या चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या रंजक कथेमुळे चाहत्यांना चित्रपटाची वाट पाहण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर सैफसह प्रेक्षकांचा आवडता सुपरस्टार हृतिक रोशनला या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून त्यानंतर तो सर्वाधिक पसंतीचा हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणून समोर आला आहे.

या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या लूकची आणि ऑनस्क्रीन पात्रांची झलक पाहायला मिळते. या चित्रपटात हृतिकच्या 'वेधा' या व्यक्तिरेखेबद्दल अनेक अटकळी समोर येत आहेत. असे बोलले जात आहे की, हृतिक रोशन या चित्रपटात तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. याशिवाय 'विक्रम वेधा' हा हृतिक रोशनच्या करिअरमधील खूप महत्वाचा चित्रपट आहे कारण हा त्याचा २५ वा चित्रपट आहे.

'विक्रम वेधा'चा प्रवास आणि बॅकस्टोरी या चित्रपटात दाखवेल आहे. यासाठी हृतिक या चित्रपटात ३ वेगवेगळ्या भूमिकेतमध्ये दिसणार आहे. ट्रेलरमध्ये 'विक्रम वेधा'च्या अनेक झलक पाहायला मिळाल्या. हृतिक रोशन हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो, जो प्रत्येक चित्रपटासोबत त्याच्या प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट आणतो.

'विक्रम वेधा' हे गुलशन कुमारच्या टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ तसेच वाय नॉट स्टुडिओ प्रॉडक्शनच्या बनर खाली तयार झालेला चित्रपट आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, भूषण कुमार आणि एस शशिकांत निर्मित 'विक्रम वेधा' चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदार्षित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT