Hrithik Roshan War 2: बॉलीवूडचा बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर 'वॉर 2' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ लीक झाला आहे, यामध्ये ऋतिक रोशन तलवारबाजी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, हा सीन चित्रपटातील त्यांच्या एंट्रीचा असल्याची चर्चा आहे. या दृश्यात ऋतिक एका जपानी मठात तलवारबाजी करताना दिसतात, या सीनमुळे चित्रपटातील त्याच्या भूमिकेची झलक मिळते.
'वॉर 2' मध्ये ऋतिक रोशन आणि तेलगू सुपरस्टार जूनियर एनटीआर यांच्यातील टक्कर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी मुंबईतील फिल्म सिटी आणि यशराज स्टुडिओमध्ये भव्य सेट उभारण्यात आले आहेत. या अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडच्या 'व्हेनम' आणि 'अॅव्हेंजर्स' सारख्या चित्रपटांवर काम केलेल्या स्टंट एक्सपर्ट्सना बोलावण्यात आले आहे. या सीनचे शूटिंग डिसेंबर महिन्यात 15 दिवसांच्या शेड्यूलमध्ये करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या अॅक्शन सीनमध्ये विविध प्रकारच्या स्टंट्सचा समावेश आहे. स्पीड बोट चेस, कार चेस, ट्रेन रेस आणि हँड-टू-हँड कॉम्बॅट अशा विविध अॅक्शन सिक्वेन्सेससाठी 11 आंतरराष्ट्रीय स्टंट कोरिओग्राफर्सची मदत घेण्यात आली आहे. या सीनसाठी ऋतिक रोशनने जपानी 'कताना' तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले असून, त्यांनी मार्शल आर्ट्सचाही अभ्यास केला आहे. या तयारीमुळे त्यांच्या अॅक्शन सीनमध्ये अधिक वास्तवता आणि तीव्रता दिसून येते.
'वॉर 2' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून, कियारा अडवाणी आणि अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणार आहे. लीक झालेल्या अॅक्शन सीनमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.