Hrithik Roshan Sons: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशनचा २३ डिसेंबर रोजी विवाह झाला. अभिनेताने त्याचे भावाच्या लग्नात खूप मज्जा केली. त्याची प्रेयसी सबा आझाद उपस्थित होती आणि त्याची एक्स पत्नी सुझान खान देखील प्रियकर अर्सलान गोनीसोबत दिसली. पण, त्याचे मुलं, रेहान आणि रिदान यांनी त्यांच्या वडिलांसोबत डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सुखबीरचे १९९९ चे लोकप्रिय गाणे "इश्क तेरा तडपावे" या गाण्यावर हृतिक रोशन त्याच्या दोन्ही मुलांसह नाचताना दिसला. या डान्सचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. त्यांनी पारंपारिक पोशाख घातले होते आणि वडील-मुलाच्या जोडीऐवजी हे तिघे भावांसारखे दिसत होते. त्यांच्या मागे, भाची सुरनिका सोनी आणि चुलत बहीण पश्मीना रोशन देखील डान्स फ्लोअरवर नाचताना दिसले.
हृतिक आणि त्याच्या मुलांचे डान्स पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले, "दोन्ही मुलांना हृतिकचे सर्व गुण वारशाने मिळाले आहेत." दुसऱ्याने लिहिले, "रोशन भाई फक्त नाचत नाही तर तो स्टेजवर आगही लावतात. तो ईशानच्या लग्नात अगदी अद्भुत होता." दुसऱ्याने लिहिले, "वाह, मस्त." हृतिक त्यांचा बाप कमी आणि मोठा भाऊ जास्त वाटतोय.
पिंकी रोशनने इंस्टाग्रामवर तिच्या नातवंडांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन दिले, "मला आजी असल्याचा खूप अभिमान आहे." फराह खानने लाल हृदयाच्या इमोजीने प्रेमाचा वर्षाव केला. याव्यतिरिक्त, आणखी एक व्हिडिओ समोर आले आहे.यामध्ये रेहान आणि रिदान एकत्र दिसत आहेत आणि लोक म्हणत आहेत, "जसा बाप, तशी मुलं."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.