Hrithik Roshan Photo Gets Viral Twitter
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Ethnic Look: एथनिक लूकमध्ये हृतिक रोशन वेधले साऱ्यांचे लक्ष; फोटोंचा सोशल मीडियावर धुराळा

Hrithik Roshan Look: बॉलिवूडचा हँडसम हंकच्या लूकने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

Pooja Dange

Hrithik Roshan In Ira Trivedi-Madhu Mantena's Mehendi Ceremony : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता मधु मंटेना लेखक - योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीसह विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नसोहळ्याची सुरुवात मुंबईत एका भव्य मेहंदी समारंभाने झाली. या सोहळ्या आमिर खान, राजकुमार राव आणि पत्रलेखा आणि इतर अनेकांसह त्यांचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांच्या लग्नाआधी होणाऱ्या विधींना सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमांमध्ये अभिनेता हृतिक रोशन देखील सहभागी झाला आहे. बॉलिवूडचा या हँडसम हंकच्या लूकने सगळ्यांची मने जिंकली आहेत. (Latest Entertainment News)

हृतिक रोशन सहसा सर्व मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाश्चात्य पोशाखांमध्ये दिसतो. परंतु त्याने मधु मंटेना आणि इरा त्रिवेदीच्या मेहंदी समारंभात त्याचा दुर्मिळ अशा लूकमध्ये दिसला. हृतिक रोशनने या कार्यक्रमासाठी संपूर्ण एथनिक लूक निवडला होता.

या लूकमध्ये तो नेहमीप्रमाणे खूप हँडसम दिसत होता. हृतिकने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्याला मॅचिंग पायजमा घातला होता. तर या शेरवानीच्या हातांना भरतकाम केलेले होते. तर त्यावर मरून जॅकेट घातला होता त्यावरही भरतकाम केलेले होते. टॅन लेदर शूज आणि त्याच्या स्टेटमेंट ब्लॅक रिंगसह लूक पूर्ण केला होता.

मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी 11 जून, रविवारी म्हणजे आज लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मधू आणि इरा यांचे लग्न मुंबईतील एका पंचतारांकित प्रॉपर्टीमध्ये होणार आहे.

हृतिक रोशन सध्या फायटरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वॉर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत यांचा हा चित्रपट असणार आहे. 2024 च्या मार्चपर्यंत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या आहे. या चित्रपटात हृतिक प्रथमच दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

वॉर 2 मध्ये RAW एजंट कबीरच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. क्रिश फ्रँचायझीच्या क्रिश 4 ची देखील सध्या चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT