Fighter Motion Poster Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Hrithik-Deepika Share Fighter Update: स्वातंत्र्यदिनी 'फायटर'चे दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित; हृतिक रोशन - दीपिका पदुकोणच्या लूकची प्रेक्षकांना भुरळ

Fighter Motion Out: फायटरच्या मोशन पोस्टरमध्ये हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचाही लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे.

Pooja Dange

Fighter Release Date Out:

हृतिक रोशनच्या एरियल अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म फायटरचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. आता स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रेक्षकांची उत्सुकता ना ताणता निर्मात्यांनी फायटरचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

फायटरमधील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, मात्र बाकीच्या स्टार कास्टविषयी सांगण्यात आले नव्हते. दरम्यान फायटरच्या मोशन पोस्टरमध्ये हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचाही लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे.

'वंदे मातरम' गाणं मोशन पोस्टर रिलीज

हृतिक रोशनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर फायटरचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मोशन पोस्टर रिलीज करताना, अभिनेत्याने 15 ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या, तसेच "वंदे मातरम्. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी भेटू." असे लिहिले आहे.

तर दीपिका पदुकोनने देखील तिच्या सोशल मीडियावर फायटरचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. तिने या पोस्टला कॅप्शन देत म्हटले आहे की, 'आपल्या गौरवशाली राष्ट्राला सलाम. स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #Fighter भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला थिएटर भेटू. #25 जानेवारी 2024.' (Latest Entertainment News)

हृतिक- दीपिकाचा लूक

फायटरच्या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला हृतिक रोशन दिसतो. स्क्वाड्रन लीडरचा युनिफॉर्म त्याने घातला आहे. त्याच्या मागे फायटर प्लेन आहे. त्यानंतर पोस्टरमध्ये दीपिका पदुकोणची एन्ट्री होते आणि ती देखील त्याच युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तर शेवटी, अनिल कपूर हातात हेल्मेट घेऊन फायटर पायलटच्या लूकमध्ये दिसतो.

चित्रपटाची स्टार कास्ट

फायटरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे, ज्यांनी पठान आणि वॉरसारखे चित्रपट केले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे तर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फाइटर 25 जानेवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन एरियल स्टंट करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT