War 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 : 'वॉर 2' रिलीज होण्यापूर्वीच मालामाल? हृतिक रोशन-ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटाची मोठी अपडेट समोर

War 2 Earn Crore Before Release : हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरच्या 'वॉर 2' चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. 'वॉर 2' रिलीज आधीच कोटींचा व्यवसाय करू शकतो.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी आणि हिंदी चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही चित्रपटांचा मनसोक्त आनंद घेत आहेत. अशात चाहते आता 'वॉर 2' (War 2 ) उत्सुकतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळणार आहेत. 'वॉर 2'मध्ये बॉलिवूडचा स्टार अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर ( Junior ntr) एकत्र झळकणार आहेत.

'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. नुकतीच या चित्रपटासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. 'वॉर 2' रिलीज आधीच कोट्यवधींचा व्यवसाय करणार असल्याचे बोले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर 2' रिलीज होण्याआधी जवळपास 85-120 कोटींची कमाई करणार आहे. 'वॉर 2'च्या निर्मात्यांना तेलुगू भाषेतील चित्रपटासाठी मोठी ऑफर देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर 2' तेलुगू भाषेतील चित्रपटाचे राइट्स 85-120 कोटी रुपयांना विकले जाऊ शकतात. साऊथचे मोठे निर्माते नागा वामसी आणि सुनील नारंग या स्पर्धेत असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सिक्वेल आहे. आता चाहते 'वॉर 2' मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच 'वॉर 2' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील पाहायला मिळणार आहे. चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT