Virat kohli and anushka sharma  saam tv
मनोरंजन बातम्या

Virat Anushka Wedding Anniversary: अनुष्का- विराटने चाहत्यांना दिला सुखी आयुष्याचा मंत्र

कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांसाठी आपण दिवसभरात काय करतो, काय नाही करत याची माहिती देण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करतात.

Chetan Bodke

Virat Anushka Wedding Anniversary: कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांसाठी आपण दिवसभरात काय करतो, काय नाही करत याची माहिती देण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करतात. खरंतर सोशल मीडिया चाहत्यांसाठी आणि कलाकारांसाठी संवाद साधण्यासाठी एक उत्तम साधन झालं आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात राहतात. बरेच कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

विराट आणि अनुष्काचे चाहते बरेच आहेत. पण ही जोडी सहसा जास्त सोशल मीडियावर सक्रिय नसते. त्यांना सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहायला आवडत नाही. काही महिन्यांपूर्वीच याचे जागते उदाहरण पाहायला मिळाले. 'आमच्या मुलीचे फोटो काढू नयेत', असा सज्जड दम देणारे पत्र या दोघांनीही माध्यमांना दिले होते. विराट- अनुष्काच्या नात्यातील असंख्य गोष्टी चाहत्यांना माहिती नाहीत. याबद्दल आज माहिती घेऊयात.

हे दोघेही लग्नाच्या आधापासून काही वर्ष रिलेशशिपमध्ये होते. या दोघांनी चोरी चोरी चुपके चुपके आपलं नातं जपलं. दोघांच्या एकत्र असण्याची बऱ्याचदा चर्चा झाली पण माध्यमांसमोर दोघांनीही याबाबत एक शब्दही काढला नाही. बरेच कलाकार रिलेशनमध्ये आल्यानंतर सोशल मीडियावर कांगावा करतात, पण तसे यांनी काही केले नव्हते.

अनुष्का आणि विराट दोघेही आपलं खासगी आयुष्य किती खासगी ठेऊ पाहतात याचा अंदाज यावरुन येतो. दोघेही नात्यामध्ये एकमेकांच्या मताला किंमत देतात हे दिसून येते. आपल्या नात्याचा कांगावा सर्वांसमोर करू नये, असे यांनी ठरवले होते. दोघांचेही मत विचारात घेऊनच निर्णय घ्यावा.

विराटचे परदेशात होणारे क्रिकेटचे सामने, अनुष्काचे सलग काही महिने परदेशांत शूटिंगमुळे व्यस्त राहणे. या विषयावर दोघांनीही इमोशनल ड्रामा न करता एकमेकांच्या करिअरमध्ये कधीही अडथळे येण्याचा प्रयत्न केला नाही.

या उलट एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत उभे राहिले. नात्यात असताना साथीदाराला कशी साथ द्यायची ही बाब विरुष्काकडून शिकायला हवी. या दोघांच्याही अनेक अशा गोष्टी आहेत त्या जर चाहत्यांना, सर्वसामान्य जनतेने जर कळाल्या तर नात्यावर दुष्परिणाम होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT