Shraddha Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor : 'श्रद्धा कपूर'ला कसा पाहिजे लाईफ पार्टनर? चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितली मनातली गोष्ट

Shraddha Kapoor Love Life : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' ला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात कोटींची कमाई केली आहे. अशात श्रद्धाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपल्याला कसा जोडीदार पाहिजे, याचा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा चित्रपट 'स्त्री 2' ( Stree 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील श्रद्धा कपूरची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर श्रद्धाच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अलीकडेच श्रद्धाला सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेली भारतातील दुसरी सेलिब्रिटीचा मान मिळाला आहे. डाउन-टू-अर्थ अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

सध्या श्रद्धा कपूर 'स्त्री 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबद्दल बोलत आहे. स्त्री 2 च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये श्रद्धाला लग्नासंबंधी विचारल्यावर ती म्हणाली की, 'ती एक स्त्री आहे, तिला जेव्हा वधू बनवायची असेल तेव्हा ती बनेल.' श्रद्धा बऱ्याच दिवसांपासून राहुल मोदीला डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, तीने अलीकडेच राहुल मोदीला (Rahul Mody) इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

'स्त्री 2' चित्रपट

श्रद्धा कपूरचा चित्रपट 'स्त्री 2' बॉक्स ऑफिस जागवत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून तो चांगली कमाई करत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांचा भन्नाट अभिनय दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT