Akshay Kumar Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Video : धक्काबुक्की अन् रडारड; अक्षयनं हात जोडून चाहत्यांना केली विनंती, 'हाऊसफुल 5'च्या इव्हेंटदरम्यान नेमकं झालं काय?

Housefull 5-Akshay Kumar : नुकताच अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो हात जोडून चाहत्यांना विनंती करताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'हाऊसफुल 5' ची (Housefull 5) चर्चा पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5' चे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकताच पुण्यात एक कार्यक्रम झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'हाऊसफुल 5'च्या प्रमोशनचा कार्यक्रम काल ( 1 जून) पुण्यात पार पडला आहे. हा कार्यक्रम पुण्यातील मॉलमध्ये झाला. कलाकारांना भेटण्यासाठी येथे खूप गर्दी पाहायला मिळाली.

पुण्यात झालेल्या 'हाऊसफुल 5' च्या कार्यक्रमात गर्दी वाढल्यामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की झाली. यामुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) चाहत्यांना धक्काबुक्की न करण्याची विनंती केली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मॉलमध्ये स्टेजवर 'हाऊसफुल 5'चे कलाकार येताच त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. तेव्हा एका महिला चाहत्याला लागले आणि ती चाहती रडू लागली. त्यानंतर 'हाऊसफुल 5'च्या टीम तिला सावरताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुली आणि महिला धक्काबुक्कीमुळे रडताना दिसत आहे. तेव्हा अक्षय कुमार चाहत्यांना म्हणतो की, "मी हात जोडून विनंती करतो की, धक्काबुक्की करू नका. येथे महिला आणि मुले आहेत. कृपया, मी सर्वांना विनंती करतो धक्काबुक्की करू नका." अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्टेजवर उभे असलेले कालाकार देखील तणावात पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चाहते कलाकारांना भेटण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा त्यांच्यात मोठी धक्काबुक्की होत आहे. गर्दी शांत झाल्यानंतर,'हाऊसफुल 5'च्या टीमने कार्यक्रम सुरू केला. त्यांनी आपल्या जबरदस्त डान्सने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT