Bipasha Basu Announce Pregnancy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu Announce Pregnancy : बिपाशा-करणच्या घरी येणार नवा पाहुणा; बोल्ड पोस्टमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा

बॉलिवूडचे हॉट कपल अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर कायमच चर्चेत असतात. या कपलने नुकतेच त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bipasha Basu-Karan Singh Announce Pregnancy | मुंबई : बॉलिवूडचे हॉट कपल अभिनेत्री बिपाशा बसू(Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर(Karan Singh) कायमच चर्चेत असतात. या कपलने नुकतेच त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशाने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॅान्ट करत तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशासोबत करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. बिपाशानं दिलेली गुड न्यूज ही तिच्या चाहत्यांना सरप्राईज ठरली आहे.

बिपाशा बसूने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा पती करण सिंग ग्रोव्हरने बेबी बंपवर हात ठेवला आहे. बिपाशा बसूने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवरील पोस्टमध्ये तिच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, बिपाशा आई होणार आहे आणि या पोस्टमुळे आता या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

चाहत्यांना खुशखबर देताना बिपाशाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, आमच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे, या क्षणाने आम्हाला खूप आनंद दिला आहे, आम्ही आमचं आयुष वैयक्तिकरित्या सुरू केलं होत आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एक झालो. पण लवकरच…आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. आमच्या प्रेमाने एक नवीन सुरुवात केली आहे. तुम्हा सर्वांचे आभार, तुमचं प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.'

बिपाशा आणि करणची भेट 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर झाली आणि यादरम्यान दोघे प्रेमात पडले आणि काही वर्षे डेट केल्यानंतर अखेर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी लग्न बंगाली पद्धतीने केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT