Shashank Ketkar Shared Mumbai Pollution Video Instagram
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar Video: “एकत्र येऊन बदल करु शकतो, पण कधी ?”; रस्त्यावरची अस्वच्छता पाहून शशांक केतकर संतापला

Shashank Ketkar Shared Mumbai Pollution Video: शशांकने मुंबईच्या रस्त्यावरील शेअर केलेल्या कचऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Shashank Ketkar Shared Mumbai Pollution Video

'होणार सुन मी ह्या घरची' फेम अभिनेता शशांक केतकर आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. शशांकने आपल्या सिनेकारकिर्दित नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या सर्वच माध्यमांमध्ये काम करत त्याने आपली ओळख प्रस्थापित केली आहे. अभिनेता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

शशांकने मुंबईच्या रस्त्यावरील शेअर केलेल्या कचऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. यावेळी त्याने आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी असल्याचंही म्हटलं आहे. शशांकने हा व्हिडीओ मुंबई महानगरपालिकेला टॅग केला आहे. (Marathi Actors)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने रस्त्यावर असलेले घाणीचे साम्राज्य दाखवले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने आपलं मत मांडत मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे. यावेळी त्याने आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी असल्याचंही म्हटलं आहे. सध्या त्याच्या ह्या व्हिडीओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Social Media)

"रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत! आपण सर्व एकत्र येत बदल घडवू शकतो! पण कधी? हा बदल घडवण्याची आपली खरंच इच्छा आहे का????" असं कॅप्शन शशांकने व्हिडीओला दिले आहे. पुढे शशांकने #reality #dirty #mumbai #polution #bmc @my_bmc #हेनाहीचालणार #येनाहीचलेगा असे हॅशटॅग वापरलेय.

अनेकांनी या पोस्टमुळे त्याला सपोर्ट केले आहे तर, काहींनी त्याला ट्रोल सुद्धा केले आहे. अनेकांनी शशांक तुझं मत बरोबर असल्याची प्रतिक्रिया दिली. तर आणखी एक युजर म्हणतो, 'हिचं तर शोकांतिका आहे.. वर वर चं सुशोभीकरण करून काही उपयोग नाही आतचं खूप गरज आहे...' तर एका युजरने शशांकला 'काल तर अटल सेतूचा व्हिडीओ टाकलास ना, आता काय झालं' असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT