tom stoppard passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Artist Death: प्रसिद्ध पटकथा लेखकाचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Artist Death: हॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक टॉम स्टॉपर्ड यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Artist Death: हॉलिवूड ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पटकथालेखकांपैकी एक टॉम स्टॉपर्ड यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

टॉम स्टॉपर्ड कोण होते?

१९३७ मध्ये चेकोस्लोव्हाकियामध्ये जन्मलेल्या टॉम स्टॉपर्ड यांचे बालपण कठीण गेले. नाझी आक्रमणानंतर त्यांचे कुटुंब सिंगापूरला गेले. त्यानंतर परिस्थितीमुळे टॉमची आई तिच्या दोन मुलांसह भारतात आली. टॉम स्टॉपर्ड हा बालपणापासूनच कलाकार होते. त्यांनी अनेक नाटके लिहिली त्यामुळे त्यांना बरीच ओळख मिळाली.

या नाटकांनी टॉम स्टॉपर्डला वेगळी ओळख दिली...

टॉम स्टॉपर्ड यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट नाटके लिहिली. यामध्ये "जंपर्स," "ट्रॅव्हेस्टीज," "द रिअल थिंग," "आर्केडिया," आणि "रॉक 'एन' रोल" सारख्या नाटकांचा समावेश होता, ज्यांनी त्यांना मनोरंजन उद्योगात पटकथा लेखक म्हणून स्थापित केले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

टॉम स्टॉपर्ड यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन ऑलिव्हियर पुरस्कार, पाच टोनी पुरस्कार आणि एक ऑस्कर ("शेक्सपियर इन लव्ह" साठी) मिळाला. रंगभूमीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल, १९९७ मध्ये त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाइटची पदवी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT