मनोरंजन बातम्या

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं; मनोरंजनसृष्टीत खळबळ

James ransone death : प्रसिद्ध अभिनेते जेम्स रॅन्सन याने आयुष्य संपवल्याची घटना घडली. जेम्सच्या मृत्यूने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

हॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू

अभिनेता जेम्सचा मृतदेह घरात आढळला

जेम्सने घरात आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय

हॉलिवूड सिनेसृष्टीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. प्रसिद्ध अभिनेते जेम्स रॅन्सोन यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता जेम्स याचा शुक्रवारी घरात मृतदेह आढळला. जेम्सने घरातच आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूने सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

जेम्सने क्राइम ड्रामा सीरीज 'द वायर'मध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने सीरीजमध्ये चेस्टर जिग्गी सोबोटका या पात्राची भूमिका साकारली होती. तर सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये गोदी कामगाराची भूमिका साकरली होती. त्यांच्या भूमिकेने टीव्ही इंडस्ट्रीने एक वेगळी ओळख मिळवून दिली.

सिनेसृष्टीतील कलाकारांकडून जेम्सला श्रद्धांजली

जेम्सने 'इट : चॅप्टर टू' या हॉरर सिनेमातही महत्वाची भूमिका साकारली होती. जेम्ससोबत सिनेमात बिल हॅडर, जेसिका चेस्टन, जेम्स मॅकएवॉय आणि बिल स्कार्सगार्ड सारखे कलाकार दिसले होते. जेम्सच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांना जेम्स अष्टपैलू अभिनेता वाटायचा.

जेम्सचा जन्म हा १९७९ साली बाल्टीमोरमध्ये झाला. त्याने मॅरीलँडच्या कार्वर सेंटर फॉर आर्ट्स अँड टेक्नोलॉजी येथून शिक्षण पूर्ण केल होतं. त्यानंतर त्याने २००२ साली केन पार्क सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमात अभिनयाची झलक दाखवली.

जेम्सचं वैयक्तिक आयुष्य देखील संघर्षमय होतं. त्याने २०२१ साली त्याने बालपणी लैंगिक शोषण झाल्याचे जाहीर केले होते. यामुळे नैराश्यात गेलेल्या अभिनेता नशेच्या आहारी गेला होता. अभिनेता जेम्सच्या निधनानंतर हॉलिवूडचं मोठी हानी झाल्याचं म्हणत चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर का लावायचा असतो?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये किरकोळ कारणांवरून तरुणाला अमानुष मारहाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

दिवसाढवळ्या थरार! ५ जणांनी पाठलाग केला, रस्त्यात गाठून २५ वर्षीय तरुणाला क्रूरपणे संपवलं, हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik Mayor Race : अनुभवी विरुद्ध निष्ठावान; कोण होणार नाशिकचा महापौर? ४ महिलांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT