Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

Jalgoan Crime: जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. शेतामध्ये १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं.
Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Jalgoan CrimeSaam Tv
Published On
  • जळगावमध्ये एलससीबीची मोठी कारवाई

  • मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली परिसरात एलसीबीने छापा टाकला

  • १३ पुरुष आणि १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

  • हॉटेलच्या मागे शेतात करत होते अश्लिल कृत्य

संजय महाजन,जळगाव

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एलसीबीने मोठी कारवाई केली. हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य करणाऱ्या महिला आणि पुरूषांना अटक करण्यात आली. १३ पुरुष अन् १० महिलांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली शिवारात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याच्या आरोपावरून १३ पुरुष आणि १० महिलांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी सर्व महिला राजस्थानमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, घोडसगाव-चिखली परिसरातील काही हॉटेलांच्या मागील शेतांमध्ये महिला आणि पुरुषांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.

Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी महिला आणि पुरूष नको त्या अवस्थेत आढळून आले. कारवाईदरम्यान २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या सर्वांची चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्थानिकांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com