Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passed Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याने 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

वयाच्या 71 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

अभिनेते अनेक काळापासून आजारी होते.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्याचे निधन झाले आहे. प्रसिद्ध अभिनेते डोनाल्ड गिब (Donald Gibb) यांचे निधन झाले. वयाच्या ७१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते 'Revenge of the Nerds' या चित्रपट 'Ogre' (ओगर) या 'फ्रॅटर्निटी' सदस्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते.

TMZ च्या वृत्तानुसार, अभिनेते डोनाल्ड गिब काही काळापासून आजारी होते. त्यामुळे अभिनेत्याचे मंगळवारी- १२ मे रोजी संध्याकाळी निधन झाले. कुटुंबाने या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड यांचे "प्रभूवर, तसेच त्यांच्या कुटुंबावर, मित्रपरिवारावर आणि चाहत्यांवर मनापासून प्रेम होते.त्यांची उणीव तीव्रतेने भासेल आणि ते सदैव स्मरणात राहतील." कुटुंबाने या कठीण काळात त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंतीही केली आहे.

अभिनेते डोनाल्ड गिब यांचा मृत्यू टेक्सास येथील त्यांच्या राहत्या घरी कुटुंबातील सदस्य आणि मुलांच्या सानिध्यात झाला. अभिनेत्याच्या निधनाची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. डोनाल्ड गिब हे गेल्या काही काळापासून प्रकृतीविषयक समस्यांशी झुंज देत होते. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डोनाल्ड गिब यांनी चित्रपट आणि टिव्ही क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली. ज्यामध्ये 'Bloodsport','U.S. Marshals' आणि 'Hancock' सारख्या प्रोजेक्टचा समावेश होता. त्यांनी अनेकदा कठोर किंवा धाडसी व्यक्तींच्या भूमिका साकारल्या.पडद्यामागे अभिनेत्याची एक दयाळू आणि अत्यंत साधी-सरळ व्यक्ती म्हणून ओळख होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT