Hollywood actor Tom Noonan passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Hollywood actor passes away: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी येत आहे. इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम नूनन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम केले.

Shruti Vilas Kadam

Actor Death: भारतीय चित्रपटसृष्टीनंतर आता इंग्रजी चित्रपटसृष्टीतून ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक टॉम नूनन यांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी येत आहे. टॉम यांनी १४ फेब्रुवारी रोजी या जगाचा निरोप घेत वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

टॉम नूनन यांनी 'लास्ट अॅक्शन हिरो' आणि 'रोबोकॉप २' सारख्या अनेक उत्तम हॉलिवूड चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १९८० मध्ये आलेल्या 'विली अँड फिल' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या टॉम यांचे निधन हा चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे.

टॉम नूनन हे हॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. विशेषतः रोबोकॉप २ मधील त्यांचे पात्र कधीही विसरले जाणार नाही. त्यांची मैत्रीण आणि सह-कलाकार, ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री करेन सिलास यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची माहिती केली.

करेन म्हणाल्या, "माझा प्रिय मित्र आणि सह-कलाकार, टॉम नूनन यांचे गेल्या व्हॅलेंटाईन डेला निधन झाले. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पॅराडाईज फॅक्टरी थिएटरमध्ये त्यांच्या मूळ ऑफ-ब्रॉडवे नाटक 'व्हॉट हॅपन्ड वॉज...' मध्ये त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी आणि माझ्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. माझ्या आयुष्यावर आणि अभिनेता म्हणून कामावर त्यांचा प्रभाव आजही आहे."

टॉम नूननचे प्रमुख चित्रपट

टॉम नूननची अभिनय कारकीर्द १९८० ते २०१८ पर्यंत होती. या काळात त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ,वुल्फेन, इझी मनी, बेस्ट डिफेन्स, मॅनहंटर, मिस्ट्री ट्रेन, रोबोकॉप २, लास्ट अॅक्शन हिरो, हीट, फिनिक्स, द अल्फाबेट किलर या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी डाव टाकला, पण काँग्रेस ट्विस्ट आणणार; सपकाळ थेट दिल्लीत पोहचले, उमेदवार उतरवणार का?

Lakshmi Narayan Yog 2026: मे महिन्यात बनणार लक्ष्मी नारायण राजयोग , या ४ राशींच्या नशीबात येणार आनंद

Dhirubhai Ambani : धीरुभाई अंबानींचा पहिला व्यवसाय कोणता अन् पहिला पगार किती होता?

Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

SCROLL FOR NEXT