Actress Casting Couch: 'पुरुषांची पार्टी आहे, एकटी ये...'; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे सुपरस्टार हिरोने केली नको ती मागणी

Actress Casting Couch: शक्तीमान या फेमस टीव्ही मालिकेतील अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्डने सुरुवातीच्या काळातील कास्टिंग काऊच अनुभ सांगितला आहे. तिने सांगितले की तिला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.
 actress Vaishnavi macdonald casting couch
actress Vaishnavi macdonald casting couchSaam Tv
Published On

Actress Casting Couch: शक्तीमान या फेमस टीव्ही मालिकेतील गीता विश्वासच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांची मनात घर करणारी अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्डने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील कास्टिंग काऊच अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

वैष्णवीने सांगितले की तिच्या करिअरच्या सुरुवातीस एका बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली होती आणि त्या चित्रपटाची पोस्टर व बॅनर्सही तयार झाले होते. पण काही काळानंतर तीला अचानक चित्रपटातून काढून टाकण्यात आले. वैष्णवीने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की हे सर्व कॉम्प्रोमाइज न केल्यामुळे घडले.

 actress Vaishnavi macdonald casting couch
Siddharth Malhotra: 'तुम्ही नेहमीच माझ्यासोबत...'; वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली भावनिक पोस्ट

वैष्णवी म्हणाली, संध्याकाळच्या वेळी ये जरा, फक्त पुरुष बसले आहेत, ड्रिंक्स करत आहेत, प्लीज ये, असं तो म्हणाला. माझी आई माझ्यासोबत नेहमी राहायची. ती गोष्ट त्याला खूप खटकायची. माझी आई मला कधीच एकटं सोडत नव्हती. मी तिच्यासोबतच राहायचे. मला सेटवर सोडायला आणि न्यायलासुद्धा तीच यायची ही गोष्ट त्याला नाही आवडली. मी त्या हिरोला जेव्हा कॉम्प्रमाइज करण्यास नकार दिला, तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याने थेट दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेशी बोलून मला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.”

 actress Vaishnavi macdonald casting couch
Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; राजस्थान, हरियाणा आणि यूपीमधून सहा आरोपींना अटक

वैष्णवीने खुलासा केला की त्या अडथळ्यामुळे त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यापासून लांब राहिली आणि त्याच काळात 'शक्तीमान' मालिकेची ऑफर मिळाली. यामुळे तिचा करिअरचा मार्ग पूर्णपणे बदलला. ती नंतर टीव्ही क्षेत्रात सक्रिय झाली आणि अनेक मालिकांमध्ये काम करून चांगली ओळख मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com