Stephen Boss Instagram @sir_twitch_alot
मनोरंजन बातम्या

Stephen Boss: हॉलिवूड अभिनेता स्टीफन बॉसची आत्महत्या, हॉटेल रूममध्ये सापडला मृतदेह

मंगळवार 13 डिसेंबर रोजी स्टीफन बॉसनी या जगाचा निरोप घेतला आहे.

Pooja Dange

Stephen Boss News: हॉलिवूडच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डीजे स्टीफन बॉस यांचे निधन झाले आहे. मंगळवार 13 डिसेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. बॉसने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यांचा मृतदेह हॉटेलच्या एका खोलीत सापडला आहे.

टीएमएच्या अहवालानुसार, पोलिसांना लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत बॉसचा मृतदेह सापडला. स्टीफन बॉसची पत्नी अ‍ॅलिसन हॉकरने सांगितले की, स्टीफन त्याच्या कारशिवाय घराबाहेर गेला होते, ही एक विचित्र गोष्ट होती. कारण तो कधीच त्याच्या गाडीशिवाय कुठे जात नाही. (Hollywood)

स्टीफन बॉसच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबासाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

स्टीफन बॉसच्या मृत्यूनंतर, त्यांची पत्नी अ‍ॅलिसन हॉकर यांनी एका निवेदनात सांगितले की, “मला जड अंतःकरणाने सांगायचे आहे की माझे पती स्टीफन यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. तो आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व द्यायचा, प्रेम हेच त्याच्यासाठी सर्वस्व होते. तो आमच्या कुटुंबाचा कणा होता. तो एक चांगला पती आणि वडील होता, त्याच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा होता. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच जाणवत राहील." (Celebrity)

स्टीफनविषयी बोलताना अ‍ॅलिसन म्हणाली, "स्टीफन, आमचे तुझ्यावर प्रेम आहे, आम्हाला तुझी आठवण येईल आणि माझा शेवटचा डान्स नेहमीच तुझ्यासाठी असेल". स्टीफनप्रमाणेच त्याची पत्नी देखील डान्सर आहे. दोघांनी 2013 मध्ये लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taapsee Pannu Fitness Tips: तापसीसारखी फिगर हवी आहे? फिटनेससाठी या टिप्स फॉलो करा

Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Anupam Kher: वयाच संबंध नाही! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

SCROLL FOR NEXT