Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC: तारक मेहतामधील अब्दूल गेला कुठं? शो सोडल्याबाबत होतेय चर्चा; पण खरं कारण आलं समोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमधील आणखी एका कालाकाराने या मालिकेला निरोप घेतल्याचं बोललं जात आहे.

Manasvi Choudhary

टिव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हि लोकप्रिय मालिका आहे. मागील १४ वर्षापासून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र मागील काही दिवसांपासून अनेक कलाकार या मालिकेतून बाहेर पडत आहेत. दयाबेनपासून ते गुरूचरणसिंग या कलाकारांनी मालिकेला राम राम केला आहे.

अलिकडेच तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गोलीची भूमिका साकारणारा कुश शाहने या मालिकेला राम राम ठोकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबत माहिती दिली होती. त्यातच आता या मालिकेमधील आणखी एका कालाकाराने या मालिकेला निरोप घेतल्याचं बोललं जात आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अब्दुलच्या भूमिकेत असणारा शरद सांकला मालिकेत दिसत नाही आहे. संपूर्ण गोकुळ धाम परिवार त्याच्या शोध घेत आहे. या मालिकेतून अब्दुल गायब झाल्यानंतर अनेक अटकळ्या लावल्या जात आहेत. दरम्यान, अब्दुलने मालिका सोडली असल्याचं अंदाज वर्तवला जात आहे.

काही दिवसांपूर्वी गोलीची भूमिका साकारणारा कुश शाहने जेव्हा शो सोडला तेव्हा देखील अशीच चर्चा होती. तो गायब झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. मात्र काही दिवसानंतर या मालिकेमध्ये नवीन गोलीची एंन्ट्री झाली. यामुळेच आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या नवीन भागात अब्दुल कोण असेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT