Kajol SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kajol : "आता मी हिंदीत बोलू?"; मराठीत बोलत असताना हिंदीत बोल म्हटल्यावर काजोलचा पारा चढला, पाहा VIDEO

Kajol Got Angry Video : 'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यातील काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मराठीत बोलत असताना हिंदीत बोल म्हटल्यावर काजलला राग अनावर झालेला पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यातील काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये हिंदीत बोल म्हटल्यावर काजलला राग आल्याचे पाहायला मिळत आहे.

काल (5 ऑगस्टला) 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' (Maharashtra State Film Awards) सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यात आजवरच्या चित्रपट कारकिर्दीत मोलाची कामगिरी केलेल्या कलाकारांना गौरवण्यात आले. बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री काजोलला (Kajol ) 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024' प्रदान करण्यात आला आहे. तसेच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना देखील 'स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024'ने सन्मानित करण्यात आले.

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यातील काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिला हिंदीत बोलायला सांगितल्यामुळे ती चिडताना दिसत आहे. नेमकं झाले काय, जाणून घेऊयात. पुरस्कार सोहळ्यानंतर काजोल मीडियाशी संवाद साधत होती. तेव्हा अचानक मराठी बोलता बोलता काजोल भडकली.

मीडियाशी बोलताना काजोल म्हणाली, "हा पुरस्कार मला वाढदिवसाच्या दिवशी मिळाला माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मी खूप खुश आहे की, आज माझ्यासोबत माझी आई देखील आहे. हा पुरस्कार तिला देखील आधी भेटला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी खूप गोष्ट आहे." त्यानंतर तिला एका मीडिया प्रतिनिधीने हिंदीत बोलण्यात सांगितले. तेव्हा ती खूप भडकली आणि म्हणाली की, आता मी हिंदीतून बोलू? ज्यांना समजून घ्यायचं असेल, ते समजून घेतील...(अब मैं हिंदी में बोलू? जिसको समझना है...वो समझ लेंगे)"

काजोल 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला खूप खास लूक करून आली होती. तिने पांढऱ्या रंगाची काळी नक्षीदार काठ असलेली साडी नेसली होती. ही साडी काजोलच्या आईची आहे. काजोलची आई देखील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. काजोलने पुरस्कार घेतल्यावर मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT