Syed Gulrez Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Syed Gulrez Passed Away: हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपट लेखकाचे निधन

Film Writer Syed Gulrez : त्यांनी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Priya More

Lyricist Syed Gulrez Died:

हिंदी सिनेसृष्टीतून (Hindi Film Industry) आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं निधन झालं आहे. सय्यद गुलरेज (Syed Gulrez Passed Away) यांचे 4 नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी निधन झाले. त्यांनी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सय्यद गुलरेज यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं आहे. त्यांनी नुसरत फतेह अली खान, बप्पी लहिरी, नौशाद अली, विजू शाह, अनु मलिक, अभिषेक रे, गौरव दासगुप्ता यासारख्या संगीतकारांसोबत काम केले. व्हीनस आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांनी अनेक अल्बम तयार केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगमोहन मुंद्रा, आनंद महेंद्रू, यश चोप्रा, सोलीला परिदा, जॉय ऑगस्टीन, कबीर बेदी आणि अकबर खान या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत त्यांनी काम केले होते. सय्यद गुलरेज यांनी 'अपार्टमेंट', 'जरा सी भूल - एक छोटी सी गलाती', 'मियामी से न्यूयॉर्क' आणि इतर चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सही लिहिल्या.

एक गीतकार म्हणून त्यांनी जगमोहन मुंद्रा यांच्या 'कमला' या चित्रपटातून सुरूवात केली होती. या चित्रपटाला संगीतबद्ध बप्पी लहिरी यांनी केले होते. तर सलमा आगा आणि पंकज उधास यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. 'विषकन्या', 'जनम कुंडली', 'आ देखो जरा', 'आलू चाट', 'विजय', 'अपार्टमेंट' हे त्यांचे चित्रपट आहेत. 'कुछ दिल से' हा त्यांचा काव्यसंग्रह आहे.

चित्रपट दिग्दर्शक राजेश राठी यांनी गुलरेज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की, 'जगमोहन मुंद्रा यांचे सहाय्यक म्हणून 'कमला' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारे ते उत्स्फूर्त गीतकार आहेत. संगीत सुरू असताना, बप्पीदांसोबत गुलरेज मला बाहेर घेऊन जायचा, सिगारेट ओढायचा आणि संगीत संपेपर्यंत त्याचे बोल तयार व्हायचे. तो नेहमीच माझा एक बाउंसिंग बोर्ड म्हणून वापर करत असे. त्यांची गाणी नेहमीच आकर्षक आणि अर्थपूर्ण असायची आणि त्यांना विनोदाची उत्तम जाण होती. आज आपण एक अतिशय प्रतिभावान लेखक गमावला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

SCROLL FOR NEXT