Hina khan : सोनी टीव्हीवरील 'चॅम्पियन का टशन' या कार्यक्रमात हिना खानला पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. लवकरच प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये, जेव्हा जज गीता कपूरने हिना खानला विचारले की तुमची कहाणी सर्वांना प्रेरणा देते. जेव्हा तूला कळले की तूला कर्करोग आहे, तेव्हा तू त्यावर मात करण्याचा कसा विचार केलास आणि कसे त्याला खूप सकारात्मकतेने तोंड दिलेस? गीता कपूरच्या या प्रश्नाला उत्तर देताना हिना खान म्हणाली, “जेव्हा मी शस्त्रक्रियेसाठी गेले होते. मला डॉक्टरांनी मला सांगितले की ही सर्जरी ८ तास चालेल. पण ही सर्जरी १५ तास चालली.”
हिना पुढे म्हणाली, जेव्हा त्यांनी मला बाहेर आणले तेव्हा मला फक्त एवढेच दिसले की सर्वजण माझ्यासाठी बाहेर उभे होते. मग मला जाणवलं की हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच कठीण आहे. पण जे तुमच्यावर उपचार करतात, तुमची काळजी घेतात त्यांच्यासाठी हा प्रवास तुमच्यापेक्षाही कठीण आहे. म्हणून जेव्हा मला कळले की मी कर्करोगाने ग्रस्त आहे, तेव्हा मी ठरवले की मी हा आजार सामान्य करेन. माझी काळजी घेणाऱ्यांसाठी मी हिंमत हरणार नाही.
कर्करोगातही काम सुरूच राहिले
हिना म्हणाली, “मी केमोथेरपी दरम्यानही शूटिंग केले आणि प्रवास केला. मी दररोज माझा व्यायाम करायचे. मी माझे डबिंग पूर्ण केले. या काळात मी रॅम्प वॉकही केला आणि आजही या शोमध्ये येण्यापूर्वी मी रेडिएशन सेशन केले आहे.” हिना खानचे हे शब्द ऐकून स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. 'चॅम्पियन का टशन'चे सर्व स्पर्धक हिनासमोर त्यांचे डान्स सादर करुन तिला प्रोत्साहन देताना दिसले.
हिना खान झाली भावुक
हिना खानसोबत चित्रित झालेल्या या शोला निर्मात्यांनी भावना, शक्ती आणि नृत्याचा एक अद्भुत उत्सव म्हटले आहे. या सेलिब्रेशनमध्ये, सोनी टीव्हीच्या डान्स रिॲलिटी शोमधील सर्व मुले हिना खानसाठी डान्स सादर करताना दिसणार आहेत. जेव्हा हिना तिचा हृदयस्पर्शी प्रवास पाहते तेव्हा ती भावुक होते. सर्वांचे कौतुक करत हिना म्हणते की मला या स्टेजवर रडायचे नाही. पण माझा दिवस खास बनवल्याबद्दल सर्वांचे आभार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.