Mukkam Post Devach Ghar : लहान मुलांचं सुंदर भावविश्व रेखाटणारं; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटातील 'सुंदर परीवानी' गाणं प्रदर्शित

Sundar Pariwani Song : लहान मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तर तर त्यांच्या पालकांना कधीच देता येत नाहीत असाच एक प्रश्न या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटातील चिमुकली विचारत आहे.
Myra Vaikul Sundar Pariwani Song
Myra Vaikul Sundar Pariwani SongPR
Published On

Mukkam Post Devach Ghar : "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या बहुचर्चित चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या टीजर आणि ट्रेलरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे.आता या चित्रपटातलं "सुंदर परीवानी..." हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल.

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगण्यात आली आहे. एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून तिचा देवाला शोधण्याचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "सुंदर परीवानी, करून वेनीफनी दिसाया हवं झगामगा.. असे छान, सोपे शब्द असलेल्या या गाण्यात एका मुलीच्या भावभावनांचं चित्रण करण्यात आलं आहे. गावात राहणाऱ्या या मुलीचं घर, तिच्या घरातलं वातावरण, शाळा, मैत्रिणींबरोबरचं तिचं खेळणं यातून तिच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.

Myra Vaikul Sundar Pariwani Song
Amir Khan : १००० कोटीच्या चित्रपटानंतर राजामौली बनवणार आमिर खानसोबत महाभारत ? म्हणाले, 'आमिर खानच्या नावाचा...'

चिनार – महेश यांनी संगीत दिलेल्या 'सुंदर परीवानी' या गाण्याचं लेखन मंगेश कांगणे यांनी केलं आहे. तर स्वरा बनसोडे या गायिकेनं हे गाणं गायलं आहे. बऱ्याच काळानं मुलांच्या भावविश्वाला साजेसं गाणं आलं आहे. त्यामुळे या गाण्याला विशेष दाद मिळणार यात शंका नाही.मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

Myra Vaikul Sundar Pariwani Song
sara ali khan and shubhaman gill : 'दो दिल मिल रहे मगर...!' शुभमन गिल आणि सारा अली खानचा फोटो व्हायरल, सत्य काय?

कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com