Hina Khan Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan: मी एक मुस्लिम आहे पण...; काश्मिरी हिना खानची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर माफी मागणारी पोस्ट

Hina Khan Post: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने माफी मागणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Hina Khan Post: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या घटनेनंतर प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिची प्रतिक्रिया समोर आली असून, ती सोशल मीडियावर भावुक झाली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिने सर्व हिंदू समुदायाची माफी मागितली आहे.

हिना खान, जी स्वतः काश्मीरची आहे, तिने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर तीन पोस्ट केल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मला खूप वाईट वाटलं आहे. जे काही पहलगाममध्ये घडलं त्याने मी फारच दुखी झाले आहे. एक काश्मीरी मुस्लिम म्हणून, मी सर्व हिंदूंनी माफ करा अशी विनंती करते. कृपया आमच्या सर्वांवर त्याचा दोष ठेवू नका.” तिचा हा संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या भावनिक आणि संवेदनशील भूमिकेचं कौतुक केलं आहे.

तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये हिनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी एक मुस्लिम आहे पण एक माणूस म्हणून मला लाज वाटते. या क्रूरतेने ज्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्वांची मी माफी मागते. पण मला हे देखील सांगायचे आहे की ज्यानी हे केले त्यांचा कोणताही धर्म नव्हता. तो कोणत्याही धर्माचा असला तरी, त्याचा मानवतेशी काहीही संबंध नव्हता. तो मुस्लिम असू शकत नाही." हिनाने असेही लिहिले की ती एक भारतीय मुस्लिम आहे जी संविधानावर, देशाच्या सशस्त्र दलांवर आणि भारतीयत्वावर विश्वास आहे. अशा दहशतवाद्यांविरुद्ध कोणतीही सौम्यता बाळगू नये.' असे तिने पुढे लिहिले.

काश्मीरचे सत्य

तिसऱ्या पोस्टमध्ये हिनाने तिच्या मूळ गावी काश्मीरचे बदलते चित्र लोकांसमोर मांडले. तिने लिहिले की जे लोक अजूनही काश्मीरला दहशतवाद आणि फुटीरतावादाचे प्रतीक मानतात ते सत्यापासून खूप दूर आहेत. हिनाने लिहिले की, "आजचे काश्मीर बदलले आहे. आता येथे 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या जातात, मुले हातात तिरंगा घेऊन अभिमानाने चालत आहेत. आता काश्मिरी पंडित परत येत आहेत आणि काश्मीरला पुन्हा 'पृथ्वीवरील स्वर्ग' बनवण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरला आता हल्ल्यांची नाही तर पाठिंबाची गरज आहे. आपल्याला इथे पर्यटन हवे आहे, दहशतवादी नाही. काश्मीरला आपल्याला बंधुत्वाची गरज आहे, वेगळेपणाची नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

SCROLL FOR NEXT