Hera Pheri 3 Start Shooting Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hera Pheri 3: पुन्हा होणार हास्याचा धमाका..! बाबूभैय्या, राजू आणि श्यामच्या 'हेरा फेरी ३'च्या शूटिंगला सुरुवात

राजू, बाबूभैय्या आणि श्याम या त्रिकुटाने अनेक पिढ्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. अखेर 'हेरा फेरी ३'या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून धमाकेदार सुरुवात झाली आहे.

Chetan Bodke

Hera Pheri 3 Start Shooting: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे. अशातीलच एक चित्रपट म्हणजे, 'हेरा फेरी ३'. 'हेरा फेरी ३' या चित्रपटात नक्की कोण कलाकार असणार अखेर त्याचं उत्तर उलघडलं आहे. राजू, बाबूभैय्या आणि श्याम या त्रिकुटाने अनेक पिढ्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून धमाकेदार सुरुवात झाली आहे. आता ही अतरंगी जोडी प्रेक्षकांचे किती मनोरंजन करणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

दिग्दर्शक प्रियदर्शनने नीरज व्होरा लिखित कथेवर आधारित 'हेरा फेरी' हा अप्रतिम विनोदी चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. 'ये बाबुराव का इस्टाईल है' या संवादाने सर्वांचेच मनोरंजन केले. या चित्रपटाचा सिक्वेल 'फिर हेरा फेरी' तब्बल सहा वर्षांनंतर प्रदर्शित झाला होता. त्या सिक्वेलनेही पहिल्या चित्रपटाप्रमाणे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

हेरा फेरीचे कॉमेडी व्हिडिओज, मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आता 'हेरा फेरी ३' च्या शूटिंगला सुद्धा सुरुवात झाल्याने सर्वांच्या आनंदाला उधाण आलंय. अक्षयने गेल्या वर्षी सर्वांसमोर जाहीर केले होते की, काही क्रिएटिव्ह फरकांमुळे तो 'हेरा फेरी ३' चा भाग होणार नाही. पण आता 'हेरा फेरी ३' ला पोषक वातावरण असल्याने अक्षय कुमार 'हेरा फेरी ३' साठी तयार झाल्याचं सांगण्यात येतंय.

'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी'चे निर्माते फिरोज नाडियादवाला हे बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याच्या तयारीत असून 'हेरा फेरी ३' द्वारे पुनरागमन करता आले तर ते नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांना वाटतो. काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने मुंबईत सुनील शेट्टी, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांची भेट घेऊन हेरा फेरी ३ विषयी चर्चा केली. अखेर आज हेरा फेरी ३ सिनेमाला शूटिंग झाली असून पुढच्या वर्षी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT