Kangana Ranaut And Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातूनच पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक पाकिस्तानी कलाकरांचे भारतात कार्यक्रम झाले. पण लता मंगेशकर यांचा एक तरी कार्यक्रम पाकिस्तानात झाला का, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला. थेट पाकिस्तानमधीलच कार्यक्रमातून त्यांनी विचारलेला हा प्रश्न कमालीचा चर्चेत आला आहे. त्याच भाषणाचा संदर्भ घेत कंगनाने रिट्विट केले आहे.
एकेकाळी कंगना रणौत गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात होती. पण आज ती त्यांच्या भाषणाची स्तुती करत आहे. अभिनेत्रीने जावेद अख्तर यांच्या पाकिस्तानातील वक्तव्याचे कौतुक केले आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, तो व्हायरल होत असलेला व्हिडीओ तिने रिट्विट करत ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांचे कौतुक केले आहे.
कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमीच ट्रेडिंगवर असलेल्या मुद्द्यांवर ती आपली प्रतिक्रिया देत असते. मग तो मुद्दा कोणताही असो. कंगना व्हिडीओ ट्विट करत म्हणते, "मी जेव्हा जावेद साहेबांच्या कविता ऐकायचे तेव्हा मला वाटायचे की, सरस्वतीजींनी त्यांना किती आशीर्वाद दिले आहेत. पण बघा, माणसातील काही सत्य आहे, म्हणूनच त्यांच्यासोबत खोदकाम होते. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घघरात घुसून मारलं...'
नुकतेच जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील लाहोरमध्ये 'फैज फेस्टिव्हल 2023' ला हजेरी लावली होती. त्यावेळी जावेद यांनी पाकिस्तानच्या नागरिकांसमोर त्यांची शाब्दिक धुलाई केली. यावेळी जावेद अख्तर म्हणतात, 'आम्ही मुंबईतील रहिवासी. आम्ही स्वत: पाहिले होते, आमच्या शहरावर कसा हल्ला करण्यात आला आहे. ते लोक नार्वे किंवा इजिप्तवरुन आले नव्हते. ते हल्लेखोर आजही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत, अशी तक्रार एखाद्या भारतीयाने केली तर त्याचं तुम्हाला वाईट वाटु नये.' असे थेट वाभाडे यावेळी जावेद यांनी पाकिस्तानात काढले आहेत.
सोबतच कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीहीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांचे जाहीर कार्यक्रम केले होते. पण, तुमच्या देशात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम झालेला नाही. असं म्हणताच तमाम पाकिस्तानच्या नागरीकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.