Hera Pheri 3 Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hera Pheri 3 Story...अशी असेल 'Hera Pheri 3'ची कथा, येणार नवा ट्विस्ट

चित्रपटात नक्की काय पहायला मिळेल, चित्रपटाची कथा काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक होते. अखेर याचा खुलासा झाला आहे.

Chetan Bodke

Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबूराव या तीन पात्रांनी एकत्र येत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. आजही 'हेरा फेरी' पाहताना त्याच उमेदीने प्रेक्षकांना हसायला येतं. 'हेरा फेरी' हा चित्रपट पाहिला नसेल असा मनुष्य शोधून भेटणार नाही. अशातच प्रेक्षकांचे आणखी निखळ मनोरंजन करण्यासाठी 'हेरा फेरी ३' ची घोषणा करण्यात आली आहे.

'हेरा फेरी ३' च्या नुकतंच काही दिवसांपूर्वी शूटिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटात नक्की काय पहायला मिळेल, चित्रपटाची कथा काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक होते. अखेर याचा खुलासा झाला आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार हे त्रिकुट एकत्र येत मनोरंजनाचा धमाका करणार आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा श्री गणेशा करण्यात आला. आता या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सर्वच कलाकार व्यग्र आहेत. नक्की चित्रपटाची कथा काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर याचा खुलासा झाला आहे.

'हेरा फेरी ३' ची कथा ही जिथे 'फिर हेरा फेरी' चित्रपटाचा शेवट झाला, तिथून सुरुवात होत आहे. या कथेत ट्विस्ट म्हणून संजय दत्तची ही एन्ट्री करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बंदूकांचे काय होते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘हेरा फेरी ३’ची सुरुवात ‘फिर हेरा फेरी’च्या शेवटच्या दृश्याने होईल. तिथून कथा एक झेप घेईल आणि तिन्ही पात्रांना बंदूक आणि माफियांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत घेऊन जाईल. तीन पात्र आणि बंदुका व्यतिरिक्त या कथेला ‘फिर हेरा फेरी’चा मोठा संबंध असेल.'

सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त रवी किशनच्या दूरच्या भावाची भूमिका साकारत आहे. ‘फिर हेरा फेरी’ मधील राजू, श्याम आणि बाबूराव यांनी मूर्ख बनवलेल्या अनेक पात्रांपैकी एक म्हणजे रवी किशन. त्यांच्या ट्रॅकमध्ये संजय दत्तही कॅमिओ करताना दिसेल. त्यामुळे आता ‘हेरा फेरी ३’बद्दल प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT