Hemant Dhome Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemant Dhome: 'नावाला जागला, मिसिंग झाला'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेचा चार शब्दांत टोला, पोस्ट व्हायरल

Hemant Dhome: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील स्लॅब कोसळल्यानंतर अभिनेता हेमंत ढोमेने ‘नावाला जागला, मिसिंग झाला’ अशी पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Hemant Dhome: मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्ते, रेल्वे आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशातच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळली. त्यानंतर संरक्षक भिंतीचा स्लॅब पुलावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मार्ग वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता हेमंत ढोमेने हाच व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत केवळ चार शब्दांत प्रतिक्रिया दिली. “नावाला जागला, मिसिंग झाला”, असे कॅप्शन देत त्याने अप्रत्यक्षपणे प्रकल्पावर टोला लगावला. त्याची ही पोस्ट काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेमंतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत आणि दर्जेबाबतही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT