Hema Malini Opens Up About Living Away From Dharmendra Twitter @dreamgirlhema
मनोरंजन बातम्या

Hema Malini And Dharmendra News : 'धर्मेंद्रपासून वेगळं राहून मी खूश...'; विभक्त राहण्यावर हेमा मालिनी यांचा खुलासा

Hema Malini Opens Up About Living Away From Dharmendra : हेमा मालिनी यांनी दिलेल्या मुलाखतीत आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आणि सक्सेस फुल मॅरेजबद्दल भाष्य केले आहे.

Chetan Bodke

९० च्या दशकातील लोकप्रिय कपलपैकी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र. रिल लाईफसोबतच रियल लाईफमध्येही नेहमीच चर्चेत राहणारे हे कपल. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्न केले. या कपलच्या लग्नाला ४३ वर्षे झाले असली तरीही ते एकमेकांपासून वेगळेच राहतात. धर्मेंद्र पाजी पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलांसोबत राहतात तर हेमा मालिनी ईशा आणि अहानासोबत वेगळ्या राहतात. नुकतंच हेमा मालिनी यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी आपल्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आणि सक्सेस फुल मॅरेजबद्दल भाष्य केले आहे.

लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, "कोणीही आपल्या लाईफ पार्टनरपासून वेगळं राहण्याचा विचार करत नाही. परंतु कधीकधी परिस्थितीही आपल्याला वेगळं राहण्यासाठी भाग पाडते, ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी. प्रत्येक स्त्रीला आपण पती आणि मुले यांच्यासोबत राहावं, अशी इच्छा असते. पण माझ्यासोबत वेगळीच गोष्ट घडली आहे. मला केव्हाच लाईफ पार्टनरपासून वेगळे राहिले, या गोष्टीचं वाईट वाटत नाही. मी माझ्या दोन्हीही मुलाचं अगदी व्यवस्थित पालनपोषण केल्याचा मला आनंद वाटतो. अर्थात माझ्यासोबत धर्मेंद्रही होते.."

हेमा मालिनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हणाल्या, "धर्मेंद्र नेहमीच मुलांच्या भविष्याविषयी काळजी करणारे आणि मदत करणारे वडील ठरले आहेत. धर्मेंद्र मुलांच लवकर लग्न करण्याच्या विचारात होते. पण मी त्यांना या गोष्टीबद्दल समजवलं. योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसोबत त्यांचं लग्न होईल असा मी त्यांना विश्वास दिला. देव आणि अध्यात्मिक गुरू (गुरु मा) यांच्या आशीर्वादाने, शेवटी सर्व काही व्यवस्थित झालं, असा माझा विश्वास आहे." हेमा आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात अनेक चढ उतार आले. पण त्यांच्या प्रेमाने प्रत्येक अडचणीवर मात केली आहे.

१९५४ मध्ये धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत पहिले लग्न केले होते. प्रकाश आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजयंता देओल असे चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांनी प्रकाश यांच्याकडून विना घटस्फोट घेताच १९८० मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. धर्मेंद्र यांनी जरीही हेमा मालिनी यांच्या लग्न केलं तरीही ते आपल्या पत्नीसोबत आणि त्यांच्या मुलांसोबतच राहिले आहेत. तर हेमा मालिनी ईशा आणि अहानासोबत राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT