Naseeruddin Shah On Politics In India
Naseeruddin Shah On Politics In India Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naseeruddin Shah To Modi: PM मोदींचं नाव घेत नसीरुद्दीन शाहांनी सरकारला सुनावले; म्हणाले, मुस्लिमांचा द्वेष...

Pooja Dange

Naseeruddin Shah On Politics In India: राजकारण आणि धर्म हे दोन्हीही संवेदनशील विषय आहेत. यावर नेहमीच वेगवेगळ्या स्तरातून चर्चा, टिका, दावे-प्रतिदावे होत असतात. अशातच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहांनी यावर भाष्य केले आहे.

नसीरुद्दीन शाह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत. ते नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. नुकतचं त्यांनी धरणाच्या होत असलेले राजकारण यावर भाष्य केले आहे.

'मुसलमानांचा द्वेष करणे' ही आता एक फॅशनेबल गोष्ट बनली आहे. अशा भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले आहे. 'ही सध्याची सर्वात जास्त चिंताजनक बाब आहे.'असेही त्यांनी म्हटल आहे. (Latest Entertainment News)

धर्मांचं राजकारण करुनही लोकांची पाठ...

कर्नाटकमध्ये मोदींनी केलेल्या प्रचारावर बोलताना नसरुद्दीन शाह म्हणाले की, धार्मिक द्वेष, धर्मांचं राजकारण करुनही भाजपाची पराभव झाला, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. "कलेच्या माध्यमांतून लोकांपर्यंत चुकीची माहिती आणि चुकीचा प्रचार गेला जात आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. मुसलमानांविरुद्ध द्वेष खुप प्रमाणात वाढला आहे आणि तीच सध्याची फॅशन बनली आहे." असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी म्हटले की, "हे खुप जास्त चिंताजनक आहे की एखादा प्रोपगंडा पसरवला जात आहे. मुस्लीम द्वेष ही एक सुशिक्षित लोकांमध्ये फॅशन बनली आहे. आपण लोकशाहीबद्दल बोलतो पण आपण का सगळ्या धर्मांना मध्ये घेतो? निवडणुक आयोग सध्या मुक प्रेक्षकांचे काम करत आहे" असाही उल्लेख त्यांनी केला आहे.

"निवडणुक आयोग या सर्व परिस्थितीवर एकही शब्द उच्चारत नाही. मत देताना 'अल्लाहू अकबर बोलून बटण दाबा' असे जर कोणी मुसलमान नेत्याने म्हटले असते तर गोंधळ झाला असता. पण इथे पंतप्रधानचं अशा गोष्टी लोकांसमोर बोलतात तरीही हरतात.

मला आशा आहे की राजकारणात धर्मांचं राजकारण बंद होईल. सध्या मुस्लीम द्वेष फॅशन बनत आहे. अजुन किती काळ राजकारणात धर्मांचा वापर होतो ते पाहुया." अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-नारायण राणेंची निलम कंट्री येथे भेट

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

SCROLL FOR NEXT