Priyadarshini Indalkar Instagram
मनोरंजन बातम्या

Priyadarshini Indalkar Post: ‘लग्नाला ६० दिवस बाकी’, प्रियदर्शनीच्या पोस्टने अभिनेत्रीच्या लग्नाची एकच चर्चा

Priyadarshini Indalkar News: हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने सोशल मीडियावर ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Priyadarshini Indalkar

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच आपल्या हटक्या फॅशनमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रियदर्शनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रियदर्शनी कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आपल्या चित्रपटाबद्दल, नाटकाबद्दल किंवा हास्यजत्रेबद्दल माहिती शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ #नवरदेव #जानेवारी२०२४ असं म्हणत प्रियदर्शनीने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी लग्नासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी तिला आगामी प्रोजेक्टबद्दलही शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियदर्शनी इंदलकरच्या ह्या नव्या पोस्टवर अनेकांनी तिच्या अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ‘अगं तु पण लग्न करतेस का?’, ‘उगाच असले Heart Attack देऊ नकोस’ आणि ‘पत्रिकेवर नाव असेल तरच येईल’ अशा मिश्किल भाषेत कमेंट्स काही युजर्सने केल्या आहेत. तर अनेकांनी तिला तुझ्या आगामी नाटकासाठी आणि चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत, असं म्हणाले आहेत.

तर काही युजर्सने प्रियदर्शनीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. येत्या जानेवारी महिन्यातच तिच्या पोस्टचे गुपित उघड होणार आहे.

प्रियदर्शनी इंदलकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रिया मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमधील वेबसीरीजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रियाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी मिळाली. ‘सोयरीक’, ‘भाऊबळी’ आणि ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून तिने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. गेल्या काही दिवसांपूर्वी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झालेल्या ‘फर्जी’ या वेबसीरीजमधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

SCROLL FOR NEXT