Singer Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Death: 'छातीत दुखू लागलं, तोंडातून पाणी आलं'; प्रसिद्ध गायकाच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडलं? भावाने केला खुलासा

Singer Death: हरियाणवी गायक पेप्सी शर्मा यांच्या निधनानंतर, त्यांचे भाऊ ऋषीपाल यांनी एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. रविवारी पेप्सी शर्मा 'पाटला' गावात पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबक काय घडलं आणि त्यांचं निधन का झालं हे सांगण्यात आलं आहे.

Shruti Vilas Kadam

Singer Death: प्रसिद्ध हरियाणवी गायक पेप्सी शर्मा यांचे काल निधन झाले. त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली असून त्यांचे कुटुंब दुःखात आहे. दरम्यान, त्यांचे भाऊ ऋषीपाल यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे. ऋषीपाल यांच्या सांगण्यानुसार, ७ जून रोजी रविवारी पेप्सी शर्मा यांना छातीत दुखू लागलं आणि त्यांना दोनदा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासून डॉक्टरांनी औषधे देऊन त्यांना घरी पाठवले. त्यानंतर त्याच दिवशी, ट्यूबवेलवर अंघोळ करत असताना त्यांची प्रकृती खालावली.

'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, ऋषीपाल यांनी सांगितले की, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ३८ वर्षीय गायक दुपारी आपल्या शेतातील ट्यूबवेलवर अंघोळीसाठी गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांनी लिंबू सरबत प्यायला आणि आईने बनवलेली खिचडी खाल्ली. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि अचानक त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

७ जूनला छातीत वेदना सुरू झाल्या

ऋषीपाल यांनी सांगितले, पेप्सी शर्मा त्या रविवारी गावात आले होते कारण त्यांना एका कार्यक्रमासाठी शहराबाहेर जायचे होते. ते आधी आईला भेटले, तिच्यासोबत वेळ घालवला आणि त्यानंतर मित्रांना भेटायला गेले. मित्रांशी बोलत असताना त्यांना छातीत दूखायला आणि त्यांनी लगेचच मित्रांना त्याबद्दल सांगितले. मित्रांनी त्यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांने चेक केली, औषधे दिली आणि कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे व विश्रांती घेतल्यास ते बरे होतील असे सांगितले.

ट्यूबवेलवर अंघोळीनंतर पुन्हा छातीत वेदना सुरु झाल्या

औषधे घेऊन घरी परतल्यानंतर, पेप्सी शर्मा दुपारी ४ च्या सुमारास ट्यूबवेलवर अंघोळीसाठी गेले आणि परत आले. त्यांनी आईला सांगितले की त्यांना बरे वाटत नाहीये आणि त्रास होत आहेत. त्रास वाढल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले; डॉक्टरांनी औषधे दिली आणि प्रकृती अधिक बिघडल्यास त्यांना मोदीनगरमधील मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

खिचडी खाताना तोंडातून फेस आला

ऋषीपालने सांगितले की, रुग्णालयातून घरी परतत असताना 'पेप्सी' यांनी फोनवरून आईला 'खिचडी' बनवायला सांगितली होती. घरी पोहोचल्यावर त्यांनी आधी लिंबू सरबत प्यायले आणि नंतर खिचडी खाल्ली. पण खिचडी खात असतानाच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. पेप्सीने आपली छाती चोळायला सुरुवात केली, त्याचा त्रास वाढला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्याचे निधन झाले."

पेप्सी शर्मा यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे?

पेप्सी शर्मा यांच्या पश्चात त्यांची पत्नी, १० वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. पेप्सी शर्मा यांचे खरे नाव यशपाल शर्मा होते आणि ते गाझियाबादमधील निवारी भागातील 'पाटला' गावचे रहिवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कालीका मंदिरात पूजाऱ्याची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Tuesday Horoscope: संपूर्ण दिवस आनंदात जाणार, 5 राशींच्या व्यक्तींना कामातून होणार लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Schwan Noodles Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी बनवा झणझणीत शेझवान नूडल्स; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT