New Marathi Serial Of Harshad Atkari  Saam TV
मनोरंजन बातम्या

Harshad Atkari New Serial : शुभम परत येतोय ! कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून हर्षद अतकरी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Kunya Rajachi Ga Tu Rani : कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेतील हर्षद, कबीर हे पात्र साकारणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Marathi Serial Of Harshad Atkari : स्टार प्रवाहच्या दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता हर्षद अतकरी पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहच्या कुन्या राजाची गं तू रानी या नव्या मालिकेत हर्षद अतिशय हरहुन्नरी अश्या पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

दुर्वा मालिकेतील केशव आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम या त्याने साकारलेल्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आजही त्याला प्रेक्षक केशव आणि शुभम या नावांनी ओळखतात. कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेतील हर्षद, कबीर हे पात्र साकारणार आहे. हे पात्र अतिशय वेगळं असल्याचं बोललं जात आहे. (Latest Entertainment News)

हर्षद अतकरी आता कबीरच्या रुपात प्रेक्षकांना दररोज भेटणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत हर्षदचं जुनं नातं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे.

कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना हर्षद (Celebrity) म्हणाला, ‘कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे.

कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती. योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला.

माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची खात्री आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी १८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

स्टार प्रवाह सध्या आघाडीच्या मराठी वाहिनीपैकी एक आहे. या वाहिनीवरील बहुतेक मालिका टीआरपी रेटिंगमध्ये टॉपला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Asrani: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बडे सरकारी अधिकारी निलंबित, काय आहे प्रकरण?

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT