Har Har Mahadev Marathi Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev: 'जेव्हा सह्याद्रीला कडा आणि मराठीला बाणा नव्हता तेव्हा...' राज ठाकरेंच्या आवाजात 'हर हर महादेव' चा टिझर प्रदर्शित !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भारदस्त आणि दमदार आवाजात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'हर हर महादेव' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली (Marathi Movie) आहे. झी स्टुडिओज नेहमीच मराठी चित्रपटांत प्रेक्षकांसाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. एक अनोखा प्रयोग करण्यासाठी 'हर हर महादेव' चित्रपट सज्ज होत आहे. एकच चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, हजारोंच्या संख्येने असलेल्या शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. (Latest Marathi News)

दिवाळी आणि भारतीय ऐतिहासिक संस्कृती यांचे एक वेगळंच नातं आहे. यंदाची दिवाळी चित्रपटप्रेमींसाठी खास आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असणारे बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटातील टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो ही एका खास व्यक्तीच्या आवाजात. (Maharashtra News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भारदस्त आणि दमदार आवाजात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर टिझर शेअर केला आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावेचा दमदार अभिनय पाहायला मिळेल. सिनेमाच्या दमदार गाण्यांना सर्व रसिकप्रेक्षकांची उत्तम दाद मिळत आहे. उत्तम कलाकार, जबरदस्त गाणी आणि सोबतच राज ठाकरे यांच्या आवाजातील टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अभिजीत देशपांडे यांच्याकडे असून निर्मितीची जबाबदारी सुनील फडतरे यांच्याकडे आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर झळकणार आहेत. सिनेमा चित्रपटप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार यात काही शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT