Manoj Bajpayee Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee Net Worth: अवघ्या २०० रुपयांवर घर सोडलं, आता बनला कोट्यवधीचा मालक; जाणून घ्या मनोज वाजपेयीबद्दल...

Manoj Bajpayee Birthday : अभिनय क्षेत्रात फॅमिलीमधील कोणताही ‘गॉडफादर’ नसतानाही करिअर केले आहे. मनोज आपल्या अभिनयाच्या जोरावर आता लक्झरी आयुष्य जगत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

Manoj Bajpayee Net Worth

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला ओटीटी विश्वाला विशेष ओळख संपादन करू दिली आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याच्या अभिनयाची चाहत्यांमध्ये क्रेझ प्रचंड मोठी आहे. अशा बहुआयामी अभिनेत्याचा आज ५५ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याचा आज (२३ एप्रिल १९६९) वाढदिवस आहे. आज आपण अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

मनोज वाजपेयी यांना आपल्या बालपणापासून अभिनयाची खूप आवड होती. पण, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने डॉक्टर व्हावं. डॉक्टर होऊन त्याने सर्व सामान्य लोकांची सेवा करावी. पण मनोजला अभिनयात फार आवड होती.

अभिनयाच्या वेडापायी मनोज वाजपेयी यांनी वडिलांना न सांगता दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाचा मनोजच्या वडिलांना खूप राग आला होता. वडिलांना दिल्लीमध्ये जाऊन अभिनय करणार असल्याचे सांगितल्यावर, मनोजला घरातून फक्त २०० रुपये मिळाले होते. त्या काळात फार स्ट्रगल करत बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले.

अभिनय क्षेत्रात फॅमिलीमधील कोणताही ‘गॉडफादर’ नसतानाही करिअर केले आहे. मनोजने छोट्या छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे. आजवरच्या या मेहनतीच्या जोरावर तो आता लक्झरी आयुष्य जगतो.

मीडिया रिपोर्टनुसार, मनोज एका चित्रपटासाठी २ कोटी रुपयांपेक्षा अधिक फी आकारतो. तर मनोज वाजपेयींच्या संपत्तीबद्दल सांगायचे तर, त्यांची एकूण संपत्ती सुमारे १५० कोटींच्या आसपास आहे. मनोजचे मुंबईतल्या अंधेरी भागामध्ये, ओबेरॉय टॉवरमध्ये अभिनेत्याचे स्वतःचे एक आलिशान घर आहे. तर बिहारमधील नरकटियागंजमध्येही मनोज यांचे स्वतःचे घर आहे. तिथे अभिनेत्याचे आई- वडील राहतात.

मनोज यांनी अंधेरीतील घर २००७ मध्ये विकत घेतले होते. त्यांच्या त्या घराची किंमत ८ कोटींच्या आसपास आहे. त्या घरामध्ये मनोज, त्याची पत्नी आणि त्यांची मुली यामध्ये घरी राहतात. मनोजला अलिशान कार्सचीही खूप आवड आहे. त्यामुळे अभिनेत्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत.

बीएमडब्ल्यू 3 सीरीज, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर सारख्या अनेक अलिशान कार्स आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज बाजपेयी अलीकडेच ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या वेब सीरीजमध्ये दिसला. या सीरीजसाठी मनोजचे खूप कौतुक झाले आहे. मनोज वाजपेयीची ही सीरीज चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT