Salman Khan And Shah Rukh Khan Friendship Day Instagram
मनोरंजन बातम्या

Friendship Day: रुसवे- फुगवे आणि प्रेम... बॉलिवूडच्या करण- अर्जुनच्या मैत्रीचे भन्नाट किस्से बघा

Bollywood Celebrity Friendship: आज फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील दोन मित्रांचे किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Chetan Bodke

Salman Khan And Shah Rukh Khan Friendship Day: आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजेच मैत्री दिन (Freindship Day). आयुष्यात निःस्वार्थ आणि कोणतीही अपेक्षा न करता आपल्यासोबत असतो तो म्हणजे मित्र. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतोच. आज अशाच बॉलिवूडमधील दोन मित्रांचे किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवुडचा किंग शाहरुख खान आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांची मैत्री कोणापासून लपलेली नाही. बॉलिवूडमध्ये नेहमीच या दोघांच्या मैत्रीची चर्चा नेहमी असते. या दोघांची मैत्री खूपच घट्ट आहे. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे शाहरुख खानच्या घरी जेव्हा वाईट प्रसंग ओढवला होता तेव्हा त्याच्या घरी जाऊन त्याला धीर देणारा पहिला व्यक्ती सलमान खान होता.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा सलमान खानने रात्री शाहरुख खानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली होती. या सर्वात एक खास गोष्ट म्हणजे, एका मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला होता, “जेव्हा माझ्या कुटुंबावर वाईट वेळ किंवा अडचण येईल. तेव्हा सर्वात आधी मला मदत करणारा व्यक्ती सलमान खान असेल.” शाहरुखच्या या विश्वासाला सलमान खानने सत्यात उतरवले होते. शाहरुख आणि सलमान खानच्या मैत्रीत अनेक गैरसमजही झाले होते. तरी देखील ते आजही दोघंही एकमेकांच्या सोबत आहेत.

शाहरुख खान आणि सलमान खानचा ‘करण- अर्जुन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. चित्रपटातील त्यांची मैत्री आणि त्यांच्यातील बॉंडिंग प्रेक्षकांना आजही बरेच भावते. सोबतच सलमान- शाहरुखने ‘कूछ कूछ होता हैं’ या चित्रपटातही एकत्र काम केले होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘पठान’मध्ये सलमान खानने पाहुणा कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती. तर सलमान च्या आगामी ‘टायगर 3’ मध्ये शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून प्रेक्षकांना तो दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Terrorist Attack : लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला; १२ जवानांचा मृत्यू, पाकिस्तानात खळबळ

Nagpur Accident: स्कूल व्हॅन आणि बसच्या अपघातात विद्यार्थिनी आणि चालक ठार, नागपुरातील घटना|VIDEO

विदर्भात भाजपाला धक्का! बड्या नेत्यासह समर्थकांनी हाती बांधलं घड्याळ; राजकीय वर्तुळात खळबळ

Dhule Accident: धुळ्यात भीषण अपघात, ब्रेक फेल झाल्याने घात झाला, कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT